मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : खळबळजनक! विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

• पोलिसांनी वेळीच झडप घातल्याने अनर्थ टळला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : खळबळजनक! विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

•पोलिसांनी वेळीच झडप घातल्याने अनर्थ टळला

मुंबई :- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आज विधानभवनाबाहेर एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे विधिमंडळ परिसरात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत या तरुणाला वेळीच रोखले आणि मोठा अनर्थ टाळला.

नेमकी घटना काय?

आज (11 मार्च ) सकाळच्या सत्रात विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक तरुण अचानक आला आणि त्याने आपल्यासोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच, तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्याला पकडले आणि त्याच्या हातातील बाटली हिसकावून घेतली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले आणि पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेले.

पाऊल उचलण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

या तरुणाची ओळख आणि त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणासाठी उचलले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. वैयक्तिक प्रश्न, जमिनीचा वाद की सरकारी कामातील दिरंगाई, यांपैकी कोणत्या मुद्द्यावरून त्याने हे कृत्य केले, याचा तपास पोलीस करत आहेत.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अधिवेशनामुळे विधानभवन परिसरात अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त असतो. अशा कडेकोट सुरक्षेत हा तरुण रॉकेलची बाटली घेऊन आतपर्यंत पोहोचलाच कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: LPG Autorickshaw Price Hike : एलपीजी रिक्षाच्या इंधन दरात एकाच दिवसात 13 रुपयांची वाढ! गॅस टंचाईमुळे प्रवास महागणार; रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

शेअर करा