मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबईच्या सत्तेसाठी 'किल्लेबंदी'! भाजप नगरसेवकांना 'नो एन्ट्री' तर हॉटेल ताजमध्ये शिंदे गटाचे 'हॉटेल पॉलिटिक्स'

• महापौर आरक्षणापूर्वीच हालचालींना वेग; नगरसेवकांची फूट रोखण्यासाठी पक्षांकडून फिल्डिंग, सत्तेचा दावा करण्याची तयारी

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM eknath Shinde On

• महापौर आरक्षणापूर्वीच हालचालींना वेग; नगरसेवकांची फूट रोखण्यासाठी पक्षांकडून फिल्डिंग, सत्तेचा दावा करण्याची तयारी

मुंबई | मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचे गणित जुळवण्यासाठी आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील आठवडाभर मुंबईबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. आरक्षण जाहीर होताच भाजप सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून ही 'किल्लेबंदी' करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये 'हॉटेल पॉलिटिक्स'ला धार चढली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्वतंत्र 'गट' स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कायदेशीर पेच टाळण्यासाठी आणि नगरसेवकांची संभाव्य फूट रोखण्यासाठी आजच गट नेत्याची निवड करून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या शर्यतीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी व तरुण चेहऱ्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नगर विकास विभागाच्या आरक्षण सोडतीनंतर मुंबईच्या सत्तेचा हा पेच सुटणार की अधिक गडद होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा