मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात! दादरमधील व्यापाऱ्याला कोर्टाने ठोठावला 5 हजार रुपयांचा दंड

•देशातील अशा प्रकारची पहिलीच शिक्षा; सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याचा ठपका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात! दादरमधील व्यापाऱ्याला कोर्टाने ठोठावला 5 हजार रुपयांचा दंड

•देशातील अशा प्रकारची पहिलीच शिक्षा; सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याचा ठपका

मुंबई | कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (BMC) कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करून दादर परिसरात कबुतरांना दाणे टाकणाऱ्या नितीन शेठ या व्यापाऱ्याला न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी हा ऐतिहासिक निकाल देत, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंबई महापालिकेने आणि उच्च न्यायालयाने आरोग्याच्या कारणास्तव दादरसह अनेक ठिकाणचे कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. असे असूनही, नितीन शेठ हे दादर परिसरात वारंवार कबुतरांना दाणे टाकत असल्याचे आढळून आले. स्थानिक तक्रारींनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. व्यापाऱ्याने न्यायालयात आपली चूक कबूल केली.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायालयाने या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 223 (ब) आणि कलम 271 अंतर्गत कारवाई केली.बंदी असतानाही दाणे टाकून लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहोचवणे. "अशा प्रकारची ही देशातील पहिलीच शिक्षा असून हे एक उदाहरण आहे. लोकांनी भविष्यात सार्वजनिक आरोग्याशी खेळू नये," असे मत न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले.

हायकोर्टाचीही बंदी कायम

ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी झाली होती. हायकोर्टाने स्पष्ट केले होते की, कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे श्वसनाचे गंभीर आजार (Hypersensitivity Pneumonitis) पसरण्याची भीती असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकण्यावर घातलेली बंदी योग्यच आहे.

शेअर करा