मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : ED चा डब्बा ट्रेडिंगवर दणका! सव्वा तीन कोटींची रोकड, गाड्या, दागिन्यांसह मुद्देमाल जप्त

•चार ठिकाणी छापेमारी; हवाला ऑपरेटरच्या सहभागाची माहिती हाती

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai News : ED चा डब्बा ट्रेडिंगवर दणका! सव्वा तीन कोटींची रोकड, गाड्या, दागिन्यांसह मुद्देमाल जप्त

•चार ठिकाणी छापेमारी; हवाला ऑपरेटरच्या सहभागाची माहिती हाती

मुंबई : डब्बा ट्रेडिंग मोबाइल अ‍ॅप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबईत चार ठिकाणी धडक कारवाई करत सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड, परदेशी चलन, महागड्या मोटरगाड्या, दागिने व पैसे मोजण्याची यंत्रे असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात हवाला ऑपरेटरचा सहभाग स्पष्ट होत असून, डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा संशय आहे.

ही कारवाई इंदूर येथील लसुदिया पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली. सहा मोबाइल डब्बा ट्रेडिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग सुरू होते. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे स्पष्ट संकेत मिळाले असून, सट्टेबाज व पंटर यांचा सहभाग असलेल्या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू आहे.

डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय?

डब्बा ट्रेडिंग हे शेअर बाजाराशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांचे जाळे आहे. यात समभागांच्या दरांवर सट्टा लावला जातो, पण त्याची नोंद अधिकृत एक्स्चेंजवर होत नाही. त्यामुळे सरकारच्या नजरेआड हे व्यवहार पार पडतात. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार व काळ्या पैशाचा वापर केला जातो. यामुळे सरकारला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन, कॅपिटल गेन, सेबी टर्नओव्हर आणि इतर करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल बुडतो.

पूर्वी डायरी किंवा लॅपटॉपमध्ये व्यवहारांची नोंद केली जायची, मात्र सध्या मोबाईल अ‍ॅप्स व वेब पोर्टल्सचा वापर करून बिनधास्त सट्टा खेळला जातो. प्रत्येक सट्टेबाज व पंटरसाठी वेगळा लॉग-इन आयडी व पासवर्ड तयार करून व्यवहार गुप्त ठेवले जातात. या व्यवहारांची हिशेबवही म्हणजेच 'बुक' टोपण नावाने उघडली जाते.

हवाला ऑपरेटरचा थेट सहभाग

या प्रकारात सट्टेबाज जिंकलेल्या रकमांची देवाण-घेवाण हवालामार्फत करतात. त्यामुळे रोखीचा कोणताही अधिकृत मागोवा लागत नाही. ईडीच्या तपासात काही मुंबईतील व्यक्तींकडून देशभरातील सट्टा खेळला जात असल्याचे समोर आले असून, त्यामुळे पकड टाळण्यासाठी टोळीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

ईडीने जप्त केलेल्या रोख रकमेसह महागड्या गाड्या व परदेशी चलनाचा तपास सुरू आहे. यातील कनेक्शन इतर राज्यांपर्यंत पोहोचले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत डब्बा ट्रेडिंग हा काळ्या पैशाचा एक नवा मार्ग बनत चालल्याने ईडीचा हा धडाकेबाज तपास आता अधिक गंभीर वळण घेण्याची चिन्हं आहेत.

हेही वाचा: Palghar Crime News : पालघर पोलिसांची वडराईत अनैतिक मानवी व्यापारावर धडक!

शेअर करा