मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबईत 'एबी फॉर्म'चे वाटप सुरू; भाजपा, ठाकरे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर!

• भाजपाकडून जुन्या-नव्यांचा मेळ, मलिकांच्या कुटुंबाला तिहेरी संधी; तर ठाकरे गटाचा 70% नव्या चेहऱ्यांवर भर

V
Vivek

2 मिनिट वाचन

NCP List of Maharashtra Assembly Election

• भाजपाकडून जुन्या-नव्यांचा मेळ, मलिकांच्या कुटुंबाला तिहेरी संधी; तर ठाकरे गटाचा 70% नव्या चेहऱ्यांवर भर

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईच्या सत्तेचा 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी भाजपाने शंभराहून अधिक उमेदवारांची तयारी पूर्ण केली असून, शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमकपणे उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईत 'स्वबळा'चा नारा देत आपली 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: प्रमुख पक्षांची उमेदवार यादी

1.भारतीय जनता पक्ष (BJP) भाजपाने अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली असून काही नव्या चेहऱ्यांनाही मैदानात उतरवले आहे.

नील सोमय्या: प्रभाग क्र. १०७

तेजिंदर सिंग तिवाना: प्रभाग क्र. ४७

तेजस्वी घोसाळकर: प्रभाग क्र. २

शिवानंद शेट्टी: प्रभाग क्र. ९

नवनाथ बन: प्रभाग क्र. १३५

संतोष ढाले: प्रभाग क्र. २१५

स्नेहल तेंडुलकर: प्रभाग क्र. २१८

अजय पाटील: प्रभाग क्र. २१४

सन्नी सानप: प्रभाग क्र. २१९

2.शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT)

ठाकरे गटाने आपल्या अनेक जुन्या फौजेवर विश्वास दाखवला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेशी युती झाल्यामुळे अनेक जागांवर समन्वय पाहायला मिळत आहे.

अंकित प्रभू: प्रभाग क्र. ५४

शैलेश फणसे: प्रभाग क्र. ५९

मेघना विशाल काकडे माने: प्रभाग क्र. ६०

देवेंद्र (बाळा) आंबेरकर: प्रभाग क्र. ६३

विठ्ठल लोकरे: प्रभाग क्र. १४१

सुनंदा लोकरे: प्रभाग क्र. १४२

सुप्रदा फातर्फेकर: प्रभाग क्र. १५०

साईनाथ साधू कटके: प्रभाग क्र. १६४

सचिन पडवळ: प्रभाग क्र. २०६

किरण बाळसराफ: प्रभाग क्र. २१५

3.राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट (NCP Ajit Pawar)

अजित पवार गटाने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबातील ३ जणांना संधी मिळाली आहे.

अब्दुल रशीद (कप्तान) मलिक: प्रभाग क्र. १६५

डॉ. सईदा खान: प्रभाग क्र. १६८ (नवाब मलिक यांची बहीण)

बुशरा परवीन मलिक: प्रभाग क्र. १७० (कप्तान मलिक यांची सून)

मनिष दुबे: प्रभाग क्र. ३

धनंजय पिसाळ: प्रभाग क्र. १११

सिरील पिटर डिसोझा: प्रभाग क्र. ४८

अहमद खान: प्रभाग क्र. ६२

4.समाजवादी पार्टी (SP)

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानेही आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मोहम्मद अजहरुद्दीन सिद्दीकी: प्रभाग क्र. २०

डॉ. शीला अखिलेश यादव: प्रभाग क्र. ६४

रुबाबा नाजीन सिद्दीकी: प्रभाग क्र. १३६

अमरीन शहज़ाद अब्दुल्ला: प्रभाग क्र. २१२

सचिन तांबे: प्रभाग क्र. ९३

हेही वाचा: Nallasopara Crime News : खबऱ्याची 'टीप', पोलिसांची 'रेड' अन् गुटखा किंगच्या मुसक्या आवळल्या! नालासोपाऱ्यात पेल्हार पोलिसांचा थरार

शेअर करा