मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : जर्मनीहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या; 45 व्या मजल्यावरून घेतली उडी

•अंधेरीतील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा अनंत द्विवेदी याने ओबेरॉय ई-स्क्वेअर इमारतीतून जीवनयात्रा संपवली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : जर्मनीहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या; 45 व्या मजल्यावरून घेतली उडी

•अंधेरीतील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा अनंत द्विवेदी याने ओबेरॉय ई-स्क्वेअर इमारतीतून जीवनयात्रा संपवली

मुंबई | गोरेगावमधील उंच इमारतीच्या 45 व्या मजल्यावरून उडी मारून अनंत द्विवेदी (वय 22) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. अनंत हा अंधेरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून तो जर्मनीमध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत द्विवेदी मंगळवारी सकाळी रिक्षाने गोरेगाव येथील ओबेरॉय ई स्क्वेअर इमारतीसमोर आला. त्यावेळी सुटे पैसे नसल्याने, "5 मिनिटात पैसे घेऊन येतो," असे सांगून तो इमारतीत गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने रिक्षाचालकाने गोंधळून पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच त्याने 45 व्या मजल्यावरून उडी मारल्याचे उघड झाले.

घटनास्थळी त्याचा गुगल पिक्सेल स्मार्टफोन सापडला, मात्र त्यात कोणतीही सुसाईड नोट नव्हती. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

अनंत द्विवेदी सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या विमानाने जर्मनीला परत जाणार होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला विमानतळावर निरोप दिला होता. त्यानंतर अनंतने त्यांना फोन करून "मी विमानात बसलोय," अशी माहिती दिली होती. मात्र खरेतर तो विमानात गेलेलाच नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दुसऱ्या दिवशी थेट गोरेगावच्या ओबेरॉय ई-स्क्वेअर इमारतीत गेला, जिथे त्याच्या कुटुंबाची एक सदनिका आहे. ही इमारत त्यांच्याकडून अधूनमधून राहण्यासाठी वापरली जाते.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, "आम्ही आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे."

हेही वाचा: Pune News : भरदिवसा सराफ दुकानावर बंदुकीच्या धाकाने दरोडा; एक चोरटा 5 तासांत अटकेत

शेअर करा