मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : 17 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; नैराश्याच्या विळख्यातून सुटका शोधताना आयुष्य संपवले

गोरेगावमधील 45 मजली टॉवरवरून उडी मारून घेतला अंत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

गोरेगावमधील 45 मजली टॉवरवरून उडी मारून घेतला अंत

मुंबई (गोरेगाव पू.) :– मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका उंच इमारतीवरून उडी मारून 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने 45व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले.

‘कोणीही जबाबदार नाही’ — चिठ्ठीतून मनस्थितीचा उलगडा

पोलीस तपासात तिच्या शालेय बॅगेतून एक चिठ्ठी सापडली असून त्यात "हा माझा स्वतःचा निर्णय आहे, यासाठी कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्ट शब्दात लिहिले होते. तिच्या आत्महत्येमागे कोणताही गुन्हेगारी हेतू नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून आरे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलगी गेल्या सहा वर्षांपासून नैराश्याशी झुंज देत होती. याआधीही आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. “सगळ्यांनाच शेवटी मरायचं आहे, मग आपण का जगतोय?” असे तिने एका सत्रात मानसोपचारतज्ज्ञांना विचारल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Ratnagiri Crime News : "फेरफाराच्या बदल्यात लाच घेताना महसूल त्रिकूट गजाआड!"

शेअर करा