मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Mgea Block News : रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block Update: दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिक कामामुळे रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Mgea Block

Mumbai Local Mega Block Update: दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिक कामामुळे रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे

मुंबई :- रविवारी (6 ऑक्टोबर ) रेल्वेचा मेगा ब्लॉक Mumbai Local Mega Block Update घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर या मार्गांवर दिवसा मेगाब्लॉक आहे.मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्यामार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण मध्य रेल्वेच्या लोकल सेवा मेगा ब्लॉकमुळे 15 ते 20 मिनिटांनी उशिराने असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Mumbai Local Mega Block Update

मध्य रेल्वे

  • माटुंगा ते मुलुंड या मार्ग अप आणि डाउन धीमा सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 असणार आहे.ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. Mumbai Local Mega Block Update
  • हार्बर रेल्वे

    • सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 मेगा ब्लॉक असणार आहे.सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी आणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव या मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कुर्ला ते पनवेलदरम्यान 20 मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. Mumbai Local Mega Block Update
    • ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.17 वाजता सुटेल आणि सकाळी 11.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 04.10 वाजता सुटेल आणि सायंकाळी 05.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. Mumbai Local Mega Block Update

      हेही वाचा: Shri Tuljabhavani Temple : साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे,तुळजापूर

      शेअर करा