मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Mahayuti News : मुंबईत महायुतीचा '137-90' फॉर्म्युला फिक्स! मुख्यमंत्री शिंदेंकडून 'नंदनवन'वर मध्यरात्री एबी फॉर्मचे वाटप; अमेय घोले ठरले पहिले उमेदवार

Mumbai Mahayuti Latest News : बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेची 'गुपित' रणनीती; चांदिवलीत दिलीप लांडेंच्या शिलेदारांना संधी, तर यामिनी जाधव पुन्हा रिंगणात

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Mahayuti News : मुंबईत महायुतीचा '137-90' फॉर्म्युला फिक्स! मुख्यमंत्री शिंदेंकडून 'नंदनवन'वर मध्यरात्री एबी फॉर्मचे वाटप; अमेय घोले ठरले पहिले उमेदवार

Mumbai Mahayuti Latest News : बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेची 'गुपित' रणनीती; चांदिवलीत दिलीप लांडेंच्या शिलेदारांना संधी, तर यामिनी जाधव पुन्हा रिंगणात

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election अर्ज भरण्याचा अवघा एक दिवस उरला असताना, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तब्बल 6 तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर भाजपने 137, तर शिवसेनेने (शिंदे गट) 90 जागांवर लढण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी रात्री उशिरा आपल्या 'नंदनवन' या निवासस्थानी उमेदवारांना बोलावून थेट एबी फॉर्म (AB Form) सुपूर्द केले.

वडाळ्यातून अमेय घोले 'फर्स्ट चॉईस'

एबी फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेत वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना पहिला फॉर्म देण्यात आला. घोले यांनी युवा सेनेतून शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना या उमेदवारीच्या रूपाने मिळाले आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नंदनवनवर इच्छुक उमेदवारांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली.

चांदिवलीत आमदार दिलीप लांडेंची ताकद

चांदिवली विधानसभा क्षेत्रात आमदार दिलीप लांडे यांनी आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 6 उमेदवारांना संधी दिली आहे:

वॉर्ड १६६: मीनल तुरडे

वॉर्ड १५६: अश्विनी माटेकर

वॉर्ड १६०: किरण लांडगे

वॉर्ड १६२: वाजिद कुरेशी

वॉर्ड १६३: शैला लांडे

वॉर्ड १६१: विजय शिंदे

यावेळी बोलताना आमदार लांडे यांनी "मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो सनातन धर्माचा झेंडा घेऊन बसेल," असा ठाम विश्वास व्यक्त केला.

यामिनी जाधव आणि राजुळ पटेल पुन्हा मैदानात

शिवसेनेने मुंबईतील आपल्या दिग्गज चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. यामध्ये वॉर्ड २०९ मधून यामिनी जाधव, जोगेश्वरीतून राजुळ पटेल आणि भटवाडी-घाटकोपरमधून अश्विनी हांडे यांचा समावेश आहे. तसेच डॉ. अदिती खूरसंगे (वॉर्ड ११) आणि परमेश्वर कदम (वॉर्ड १३३) यांनाही संधी देऊन पक्षाने सर्वसमावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.

'गुपित' यादीमागील कारण
मुंबईत महायुतीतील दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. अधिकृत यादी जाहीर केल्यास बंडखोरी होऊन मतांचे विभाजन होण्याची भीती असल्याने, एकनाथ शिंदे यांनी थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवून त्यांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. यामुळे विरोधकांना रणनीती आखण्यास वेळ मिळू नये, हाही यामागचा एक उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा