मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Local News : (24 ऑगस्ट) रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक; लोकल प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या

Mumbai Local Train Update : माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान दुरुस्तीची कामे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Local News: Important news for Mumbaikars: Block on Central, Harbour Railway tomorrow, Sunday, April 20!

Mumbai Local Train Update : माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान दुरुस्तीची कामे

मुंबई :- मुंबईकरांनो, जर तुम्ही (24 ऑगस्ट) रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेने ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात अडचण येऊ शकते. Mumbai Local Train Update

मध्य रेल्वेवर काय स्थिती?

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 या वेळेत मेगाब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावतील. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे.

हार्बर रेल्वेवर काय स्थिती?

ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान हार्बर रेल्वेवर अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असेल. या काळात ठाणे ते वाशी/नेरूळ/पनवेल दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द असतील. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

पश्चिम रेल्वेवर दिलासा

दरम्यान, पश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे. वसई रोड यार्डात केवळ मालवाहतूक मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 या वेळेत रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसेल. यामुळे चर्चगेट, बोरिवली आणि विरार मार्गावरील लोकल सेवा सुरळीत चालणार आहे.

लोकल प्रवास होणार अधिक वेगवान

पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांत 15 ठिकाणी असलेली वेगमर्यादा हटवली आहे. यामुळे लोकल गाड्या अधिक वेगाने धावू शकणार आहेत. रुळांची दुरुस्ती, पुलांची मजबुतीकरण आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाल्याने हा बदल शक्य झाला आहे. यामुळे भविष्यात प्रवाशांचा वेळ वाचणार असून लोकल प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

शेअर करा