मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या (रविवार) हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

• कुर्ला ते वाशी मार्गावरील हार्बर लोकल 5 तास बंद ;बोरिवली-राम मंदिरदरम्यान पश्चिम रेल्वेवरही काम; प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे रेल्वेचे आवाहन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Local Mega Block Complete Schedule Update

• कुर्ला ते वाशी मार्गावरील हार्बर लोकल 5 तास बंद ;बोरिवली-राम मंदिरदरम्यान पश्चिम रेल्वेवरही काम; प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे रेल्वेचे आवाहन

मुंबई :- रेल्वे रुळांची, ओव्हरहेड वायरची आणि सिग्नल यंत्रणेची नियोजित देखभाल व दुरुस्ती कामे करण्यासाठी रविवारी (12 ऑक्टोबर 2025) मुंबईतील हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होणार आहे.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक (5 तास)

कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर

वेळ :- सकाळी 11.10 ते दुपारी 4.10

परिणाम:

  • लोकल सेवा रद्द: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.36 दरम्यान सुटणाऱ्या वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान CSMT कडे येणाऱ्या गाड्या रद्द राहतील. *प्रवासाची पर्यायी सोय:
    प्रवाशांसाठी CSMT–कुर्ला आणि पनवेल–वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवली जाईल. तसेच, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवाशांना ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची मुभा (Travel Authority) देण्यात आली आहे.
  • पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक

    बोरिवली–राम मंदिर आणि राम मंदिर–कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर

    वेळ :- सकाळी 10 ते दुपारी 1 (काही ठिकाणी 2 वाजेपर्यंत वाढण्याची शक्यता)

    परिणाम

    • जलद लोकल: बोरिवली ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या सर्व अप जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.
    • पाचव्या मार्गिकेवरील लोकल अंधेरी–बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. *काही लोकल गाड्या रद्द होऊन, काही गाड्यांना गोरेगावमार्गे हार्बर लाईनवर वळवण्यात येईल.
    • मध्य रेल्वेवर प्रवाशांना दिलासा

      दरम्यान, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण दरम्यान रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा नियमितपणे सुरू राहणार आहेत.
      प्रवाशांनी नियोजित देखभाल ब्लॉकमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन, प्रवासापूर्वी वेळ आणि मार्गाची माहिती घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

      हेही वाचा: “Delhi Police चा बनाव, Digital Arrest चा डाव!”

      शेअर करा