मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Local Bomb Blast : मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष! हायकोर्टाचा मोठा निकाल

•Highcourt Decision On Mumbai Local Bomb Blast भाजपा-शिवसेनेची तीव्र प्रतिक्रिया; "संपूर्ण चौकशी अपयशी, सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Local Bomb Blast

•Highcourt Decision On Mumbai Local Bomb Blast भाजपा-शिवसेनेची तीव्र प्रतिक्रिया; "संपूर्ण चौकशी अपयशी, सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे"

मुंबई - 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने सोमवारी एक धक्कादायक निकाल दिला. या स्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या 12 आरोपींना अपुर्‍या पुराव्यांमुळे निर्दोष घोषित करत त्यांची तत्काळ मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस. चांडक यांच्या खंडपीठाने 2015 मध्ये झालेल्या शिक्षेच्या निर्णयाला पलटवले. त्यावेळी 5 आरोपींना फाशी आणि 7 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की, अभियोजन पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला आणि आरोपींना शंका असल्याच्या फायद्याचा आधार देण्यात आला.

या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, "हा निकाल दुःखद आणि धक्कादायक आहे. निश्चितच तपास आणि कायदेशीर सादरीकरणात गंभीर चुका झाल्या असाव्यात. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे की, या प्रकरणासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती गठीत करण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचारासाठी दाद मागावी."

शिवसेना नेते व खासदार नरेश महस्के यांनीही तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित करत म्हणाले, "जर सर्व आरोपी निर्दोष सुटले असतील, तर हा तपासाचा आणि तत्कालीन सरकारचा गंभीर अपयश आहे. मुंबईकरांवर घातलेला हा घाव आहे, आणि ते न्यायासाठी आजही वाट पाहत आहेत."

हेही वाचा: Thane Crime News : ठाण्यात 'एमडीचा पेडलर' जेरबंद! 1.69 कोटींचा अंमली साठा पोलिसांच्या जाळ्यात"

शेअर करा