मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Spa Racket | बुधवार पेठ नव्हे, आंबट शौकिनांचा मोर्चा आता 'फुल सर्व्हिस' देणाऱ्या 'स्पा'कडे

सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने 'पिटा' कारवाया थंडावल्या

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune spa racket

  • सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने 'पिटा' कारवाया थंडावल्या
  • पुणे, दि. 9 सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Spa Racket

    काळाच्या ओघात सर्व काही बदलत हे खरचं आहे. मग आंबट शौकिनांची पसंत मागे कशी राहणार. आंबट शौकिनांनी आता आपला मोर्चा बुधवार पेठेतून थेट 'फुल सर्व्हिस' देणाऱ्या 'स्पा'कडे वळविल्याची चर्चा आहे. स्पा च्या नावाखाली चालणारे रॅकेट नावारूपाला आले आहेत. त्यातच पुणे पोलिसांनी सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आणल्याने स्पा रॅकेट चालविणाऱ्याना सुगीचे दिवस आले आहेत. Pune Spa Racket

    पुण्यातील बहुतांशी आंबट शौकिनांकडे मुबलक पैसा असल्याने त्यांनी बुधवार पेठ ओलांडून हायप्रोफाईल 'फुल सर्व्हिस' देणाऱ्या 'स्पा'कडे मोर्चा वळविला आहे. पुण्यातील हायप्रोफाईल परिसर यासाठी कुप्रसिद्धीस आला आहे.

    'फुल सर्व्हिस' देणाऱ्या स्पा मुळे स्पा व्यवसाय होतंय बदनाम

    आयुर्वेदिक स्पा, बॉडी स्पा, थाई स्पा यांसारखे अस्सल बॉडी ट्रीटमेंट देणारे स्पा या 'फुल सर्व्हिस' देणाऱ्या स्पा मुळे नाहक बदनाम होत आहेत. 'स्पा' च्या नावाखाली रॅकेट चालत असताना 'स्पा' व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे.

    सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने 'पिटा' कारवाया थंडावल्या

    अवैध मानवी वाहतूक व वेश्या व्यवसाय यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस, गुन्हे शाखेत सामाजिक सुरक्षा पथक कार्यान्वित होते. आता सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने 'पिटा' कारवाया थंडावल्याची चर्चा आहे.

    हेही वाचा: Aundh Fir on society member | औंध : आयटी अभियंत्याच्या कुटुंबाला केले बहिष्कृत : सोसायटी सदस्यांवर गुन्हा

    शेअर करा