मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Hit & Run Case : मुंबईत खासदारच्या मुलाच्या गाडीची धडक, गंभीर जखमी, आरोपीला अटक

•MP Chandrakant Handore son Ganesh Handore car Accident खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Hit & Run Case : मुंबईत खासदारच्या मुलाच्या गाडीची धडक, गंभीर जखमी, आरोपीला अटक

•MP Chandrakant Handore son Ganesh Handore car Accident खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई :- मुंबईतील गोवंडी परिसरात खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश यांच्या गाडीने एका व्यक्तीला धडक दिली. या घटनेत गोपाल आरोटे नावाच्या व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पोलघसांनी खासदाराचा मुलगा गणेश याला अटक केली आहे.त्यांची साखरेची पातळी 550 असल्याने त्यांना इतर आजार असल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कलम 110, 125 (अ), (ब), 281, बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अ), (ब), 184 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आरोपी गणेश हंडोरे हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेला जात होता. तेथून परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेजलगत त्याने गोपाळ आरोटे नामक एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर गणेश हंडोरे तिथे थांबला नाही. त्याने तशीच आपली कार पुढे दामटली. काही प्रत्यक्षदर्शीनी त्याचा पाठलाग केला. पण तो हाती लागला नाही.

हेही वाचा: सावरकरांच्या नातवाने दाखल केला मानहानीचा खटला, न्यायालयाने राहुल गांधींना पाठवले समन्स

शेअर करा