मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Diwali News : मुंबईत दिवाळीचा 'खरेदी फिव्हर' शिगेला; दादर-क्रॉफर्ड मार्केटला जत्रेचे स्वरूप

Mumbai Diwali Festival News : फराळ, कंदिल आणि तोरणांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी; वाहतूक कोंडीत मोठी वाढ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Diwali News : मुंबईत दिवाळीचा 'खरेदी फिव्हर' शिगेला; दादर-क्रॉफर्ड मार्केटला जत्रेचे स्वरूप

Mumbai Diwali Festival News : फराळ, कंदिल आणि तोरणांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी; वाहतूक कोंडीत मोठी वाढ

मुंबई :- येत्या शुक्रवारपासून वसुबारसने दिवाळी सणाची सुरुवात होणार असल्यामुळे मुंबईतील सर्व लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दादर, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर आणि बोरिवलीसारख्या मध्यवर्ती बाजारपेठांना अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले आहे. फराळ, कपडे, तोरणं, दिवे, पणत्या आणि रांगोळीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवार आणि रविवारपासूनच ग्राहकांनी सर्वत्र मोठी गर्दी केली आहे. Mumbai Diwali News

गर्दीचा उच्चांक आणि वाहतूक कोंडी

यंदा ऑनलाईन खरेदीचा काळ असला तरी, पारंपरिक वस्तूंसाठी दादर, क्रॉफर्ड मार्केट येथे ग्राहकांची झुंबड उडाली आहे. संध्याकाळच्या वेळेत या बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला जातो.

  • दादर मार्केट मध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढल्यामुळे रस्त्यावर दुकानं थाटली गेली आहेत. रस्त्यांवर कंदिल आणि फटाक्यांमुळे सजावट झाली आहे.
  • खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. प्रभादेवीचा पूल पाडल्यामुळे आधीच दादरमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे, त्यातच आता खरेदीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
  • प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास टॅक्सीचालकही तयार नसल्याचे चित्र मुंबईत अनुभवायला मिळत आहे.
    यंदा बाजारपेठांतील विशेष आकर्षण
    दिवाळीच्या वस्तूंच्या खरेदीत यंदा अनेक नवीन गोष्टी बाजारात आल्या आहेत.
  • कंदिल: यंदा पैठणीचे कंदिल आणि मराठी भाषेचा अभिमान सांगणारे विशेष कंदिल ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
  • रांगोळी: वेळ वाचवणारे व सहज काढता येतील असे स्टेन्सिल, रंग भरण्याची सोय असलेल्या तयार रांगोळ्या, तसेच रांगोळी काढल्यासारखे दिसणारे स्टीकर उपलब्ध आहेत.
  • पणत्या: मातीच्या पारंपरिक पणत्यांबरोबरच चिनीमातीच्या पणत्या मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
  • आता पुढचे काही दिवस दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व लहानमोठ्या बाजारपेठांमध्ये अशीच झुंबड उडणार आहे.

    शेअर करा