मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Cyber Fraud News : मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई! शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी देशभरातून 7 आरोपींना अटक; 11 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

•2 कोटी 21 लाख रुपये 'होल्ड' करण्यात पोलिसांना यश; 'Warburg Pincin' नावाच्या बनावट ॲपद्वारे लुबाडले 10.98 कोटी

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Cyber Fraud News : मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई! शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी देशभरातून 7 आरोपींना अटक; 11 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

•2 कोटी 21 लाख रुपये 'होल्ड' करण्यात पोलिसांना यश; 'Warburg Pincin' नावाच्या बनावट ॲपद्वारे लुबाडले 10.98 कोटी

मुंबई | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी 98 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने (गुन्हे शाखा) अत्यंत कौशल्याने तपास करत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिसा, बिहार आणि पंजाब या राज्यांतून 7 आरोपींना अटक केली आहे.

फसवणुकीची पद्धत (Modus Operandi)
फिर्यादींना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपींनी त्यांना "Warburg Pincin" नावाचे एक बनावट मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. 29 डिसेंबर 2025 ते 19 जानेवारी 2026 या अल्प कालावधीत फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खात्यांमध्ये सुमारे 11 कोटी रुपये गुंतवण्यास लावले आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक केली.

तपास आणि अटक आरोपी

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त (सायबर गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली 9 विशेष पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी 'मनी ट्रेल'चा (पैशांचा ओघ) तपास करून पहिल्या लेयरमधील 7 खातेदारांना अटक केली.

महाराष्ट्र (गोंदिया): कुवरलाल डोमा येळे (वय 57)

उत्तर प्रदेश (देवरिया): आदर्शसेन आनंद (वय 27) आणि अमर्त्यसेन आनंद (वय 23)

ओडिसा: सुनील दीनानाथ गुप्ता (वय 41)

खिरोड चंद्रा साहु (वय 57)

बिहार (मुझफ्फरपूर): रसराज चारू बावरी (वय 32)

पंजाब (मोहाली): संजय चंदेर सिंग (वय 51)

थक्क करणारी आकडेवारी

तपासादरम्यान असे दिसून आले की, आरोपींनी बनावट नावावर उघडलेल्या बँक खात्यांमध्ये 2 कोटी 6 लाख रुपये स्वीकारले होते. या खात्यांवर देशभरातून तब्बल 13 कोटी 98 लाख 69 हजार 546 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवरून उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करून फिर्यादींच्या रकमेपैकी 2 कोटी 21 लाख रुपये होल्ड (गोठवण्यात) करण्यात यश मिळवले आहे.

ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : "अजितदादांच्या मृत्यूच्या संशयावरून भाजपला वेदना का?" संजय राऊतांचा थेट सवाल; फडणवीसांच्या इशाऱ्याचा घेतला समाचार

शेअर करा