मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : 'सोनू मेंटल'ला 'एमपीडीए'चा दणका!

•खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अनेक गुन्हे; सराईत गुन्हेगार पेशनवाज खान ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thane Crime News

•खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अनेक गुन्हे; सराईत गुन्हेगार पेशनवाज खान ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

मिरा-भाईंदर :- मिरा भाईंदर वसई-विरार आयुक्तालय क्षेत्रात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पेशनवाज असरार खान उर्फ 'सोनू मेंटल' या सराईत गुन्हेगारावर नयानगर पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती अधिनियम 1981 (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची कठोर कारवाई केली आहे. मीरा-भाईंदर, काशीमीरा आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनतेच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या या आरोपीला ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सोनू मेंटलचा गुन्हेगारी इतिहास

गेल्या अनेक वर्षांपासून नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला पेशनवाज खान उर्फ सोनू मेंटल (वय 32) हा सराईत गुन्हेगार आहे. सन 2011 पासून त्याच्यावर पुढील गंभीर गुन्हे दाखल आहेत:

खुनाचा प्रयत्न करणे (कलम 307)

जबरी चोरी करताना दुखापत करणे

गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी, दुखापत करणे

गंभीर दुखापत करणे आणि शांतता भंग करणे

यापूर्वी आरोपीवर सन 2022 आणि 2023 मध्ये प्रत्येकी सहा महिन्यांसाठी हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली होती. मात्र, तडीपार असतानाही त्याने पुन्हा गुन्हा दाखल करून आपली गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली. तडीपार असतानाही त्याने पुन्हा खून करण्याचा प्रयत्न करणे (307) आणि शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धता

सोनू मेंटलच्या सततच्या गुन्हेगारी कारवाया आणि त्यामुळे परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण पाहता, त्याच्या धोकादायक कृत्यांना आळा घालणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे नयानगर पोलिसांनी त्याच्यावर धोकादायक व्यक्ती या सदराखाली 'महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती… अधिनियम 1981 चे कलम 3(1)' प्रमाणे स्थानबद्धतेचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई-विरार यांच्याकडे सादर केला होता.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, नयानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी सोनू मेंटल याला ताब्यात घेऊन त्याला मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे स्थानबद्ध केले आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

हेही वाचा: Mumbai Terror Attack : 26/11: तो 'काळा दिवस'! मुंबईवर दहशतवाद्यांचे क्रूर आक्रमण; शूरवीरांनी वाहिलेल्या बलिदानाचे आणि शहराच्या अदम्य आत्म्याचे स्मरण!

शेअर करा