मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : पवईत हॉटेलवर छापा! व्हिसा संपलेल्या युगांडा, केनियाच्या 9 परदेशी महिलांचा 'गुप्त' निवास उघड

•मरोळ परिसरातील हॉटेल 'ड्रीम इन प्राईम'मध्ये ओळख लपवून राहत होत्या; मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•मरोळ परिसरातील हॉटेल 'ड्रीम इन प्राईम'मध्ये ओळख लपवून राहत होत्या; मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.

मुंबई :- मुंबईत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पवई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून युगांडा आणि केनिया देशातील एकूण 9 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली असतानाही त्या ओळख लपवून येथे राहत होत्या.

हॉटेल 'ड्रीम इन प्राईम'वर छापा

पवई पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे परदेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी हॉटेल ड्रीम इन प्राईम, ॲकडमी स्कूल जवळ, मरोळ, मुंबई येथे छापा टाकला.

या छाप्यामध्ये खालील नमुद 9 महिला व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील आपली ओळख लपवून राहत असल्याचे उघड झाले:

1.नामटंग प्लारिया (वय 22), 2.नवीसुबी इस्तर (वय 20), 3. कुरिया सुसान बॉम्बुयी (वय 33), 4.एनजरी बथ (वय 28),5.वर सलिस्टन (वय 28),6. मेवडे मंरे सोविनया (वय 24),7. नगुकू जॉयसे वंजिरी (वय 33), 8.मुंगेरा सरह वांजिकी (वय 28), आणि 9.मेसडिंच नेली वेपकोरीया (वय 27). या सर्व महिला युगांडा आणि केनिया या देशाच्या नागरिक आहेत.

मॅनेजरवरही गुन्हा दाखल

या परदेशी महिलांना भारतामधून हद्दपार करण्याची (Deportation) कारवाई पवई पोलीस ठाण्याकडून सुरू करण्यात आलेली आहे. तसेच, परदेशी नागरिकांना अवैधपणे आश्रय दिल्याबद्दल संबंधित हॉटेलचे मॅनेजर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण (कावसु), अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड यांनी पोलीस पथकासह ही कारवाई केली.

हेही वाचा: 'राज ठाकरे आणि मी मराठीच्या मुद्द्यावर एकत्रच राहणार!' शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचे युतीचे स्पष्ट संकेत; भाजपला दिला 'हिंदुत्वाच्या ढोंगा'वरून कडक इशारा

शेअर करा