मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : काशिमीरा पोलिसांची 'अड्डा बार'वर मोठी कारवाई; विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

लाऊडस्पीकरवर गाणी लावून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा; 1.18 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : काशिमीरा पोलिसांची 'अड्डा बार'वर मोठी कारवाई; विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

  • लाऊडस्पीकरवर गाणी लावून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा; 1.18 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
  • मीरा रोड/काशिमीरा :- मद्यविक्रीचा कोणताही परवाना नसताना ग्राहकांना बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल चालक-मालकांवर काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंशी कंपाउंड, मिरागाव येथील 'अड्डा बार ॲन्ड रेस्टॉरंट' येथे विनापरवाना दारू विकली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हॉटेलचे चालक, मालक आणि वेटरसह एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    नेमके काय घडले

    25 ऑक्टोबर 2025 रोजी काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मुंशी कंपाउंड, मिरागाव येथील 'अड्डा बार ॲन्ड रेस्टॉरंट' येथील दुसऱ्या माळ्यावर हॉटेलचे चालक व मालक विनापरवाना दारू विक्री करत होते. विशेष म्हणजे, सदर ठिकाणी ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती आणि ग्राहक लाऊडस्पीकरवर गाणी लावून नृत्य करीत होते.सदर माहितीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाणे आणि पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-1 मिरारोड यांचेकडील पथकाने संयुक्तपणे छापा कारवाई केली.

    जप्ती व गुन्हा

    हॉटेलचे चालक/मालक व ग्राहकांना दारू पुरविणारे वेटर असे एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले.बारमध्ये विनापरवाना विक्रीकरीता ठेवलेल्या रेडलेबल, रॉयल स्टॅंग, ऑक स्मित, ब्लेंडर प्राईड, कैमिनो टकीला व इतर विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूच्या बाटल्यांची एकूण किंमत 1 लाख 18 हजार 455 इतकी आहे.

    नमुद हॉटेलचे चालक/मालक/वेटर अशा एकूण 11 जणांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1941 चे कलम 65(ई) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (डब्लु)/131 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, दत्ताजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, राहुल चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1,गणपत पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

    हेही वाचा: Eknath Shinde : "महायुतीत दंगा करायचा नाही, निरोप दिला आहे" - एकनाथ शिंदे; धंगेकर-मोहोळ वादावर लवकरच पडदा पडणार

    शेअर करा