मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : ॲन्टॉपहिलमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; एका आरोपीकडून 2 बंदुका, 49 काडतुसे ताब्यात

•12 बोर डबल बेरेल गन, लोखंडी रिव्हॉल्वर आणि काडतुसे पोलिसांनी जप्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : ॲन्टॉपहिलमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; एका आरोपीकडून 2 बंदुका, 49 काडतुसे ताब्यात

•12 बोर डबल बेरेल गन, लोखंडी रिव्हॉल्वर आणि काडतुसे पोलिसांनी जप्त

मुंबई :- ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी केलेल्या धाडीत अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सरबजीतसिंह कवलजीतसिंह बजवा (52 वय) याच्या घरातून 2 अग्निशस्त्रे, 49 जिवंत काडतुसे आणि 18 बोर कारटेजस मिळून आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(25) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ॲन्टॉपहिल परिसरातील बजवा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घरझडतीत किंमत अंदाजे 40 हजार रुपयांचा "फिलगन कानपूर 2010" लिहिलेला लोखंडी रिव्हॉल्वर, 10 हजार रुपयांची 12 बोर डबल बेरेल गन, 360 रुपयांचे 18 नग 12 बोर प्लास्टिक कारटेजस आणि 24,500 रुपयांची 49 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, उप आयुक्त (परिमंडळ-4) रागसुधा आर. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक गोपाळ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील सागर घस्ते, दिनेश पाटील, सुधीर माने, अनिल बाबर, निलेश माने, सोनावणे यांनी प्रत्यक्ष कारवाई केली.सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Nalasopara News : ‘मृत्यूचा शॉर्टकट' ; नालासोपारा स्थानकात पोलिसाचा रुळ ओलांडताना मृत्यू!

शेअर करा