मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : मुंबईत 1 कोटी 25 लाखांचे सोने जप्त, बँकॉकमधून होत होती तस्करी

•हे सोने भारतात नेण्यामागचा उद्देश पत्नीला माहित नसल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

•हे सोने भारतात नेण्यामागचा उद्देश पत्नीला माहित नसल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले. बँकॉकच्या वेटजेट एअरलाइन्समधून उतरलेल्या या जोडप्याला संशयावरून ग्रीन चॅनलजवळ थांबवण्यात आले.

मुंबई :- मुंबईतील सोन्याच्या तस्करीचे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सीमाशुल्क विभागाला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) लाखो रुपयांची सोन्याची तस्करी उधळून लावली. बँकॉकच्या वेटजेट एअरलाइन्समधून उतरलेल्या या जोडप्याला संशयावरून ग्रीन चॅनलजवळ थांबवण्यात आले.

बँकॉक विमानाने सोने येणार असल्याची गोपनीय माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. ग्रीन चॅनलवर पती-पत्नीच्या एक्स-रेमध्ये गुदाशयात सोने लपवल्याचे उघड झाले. सीमाशुल्क विभागाला सोन्याच्या धूळाची 6 पॅकेट सापडली.दोघांकडे सोन्याची धुळीची 3-3 पाकिटे होती. जप्त करण्यात आलेल्या 1530 ग्रॅम सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 25 लाख 93 हजार 354 रुपये असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले.मोहम्मद वसीफ शेख याने चौकशीदरम्यान सांगितले की, सोने भारतात नेण्यामागचा हेतू त्याच्या पत्नीला माहित नव्हता. फिरण्यासाठी पती पत्नीला बँकॉकला घेऊन गेला होता, असे कस्टम विभागाने सांगितले.मोहम्मद वसीफ शेख याने स्वखुशीने सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. सोन्याच्या तस्करीच्या बदल्यात शेखला 40 हजार रुपये मिळणार होते, असे सांगण्यात येत आहे.

शेअर करा