मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : उपचाराच्या नावाखाली 'भोंदू बाबा'चा महिलेवर बलात्कार, सांताक्रुझ पोलिसांनी केली अटक!

•कौटुंबिक समस्येने त्रस्त असलेल्या महिलेवर 'भूतबाधेचा' बहाणा; तांत्रिक विधीच्या नावाखाली केले घृणास्पद कृत्य

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : उपचाराच्या नावाखाली 'भोंदू बाबा'चा महिलेवर बलात्कार, सांताक्रुझ पोलिसांनी केली अटक!

•कौटुंबिक समस्येने त्रस्त असलेल्या महिलेवर 'भूतबाधेचा' बहाणा; तांत्रिक विधीच्या नावाखाली केले घृणास्पद कृत्य

मुंबई :- कौटुंबिक आणि शारीरिक समस्यांनी त्रस्त असलेल्या एका 32 वर्षीय महिलेवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील सांताक्रुझ येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी भोंदू बाबा अब्दुल रशीद (45 वय) याला अटक केली आहे.

पीडित महिला गेल्या काही काळापासून त्रासात होती. याच संधीचा फायदा घेत अब्दुल रशीद नावाच्या एका भोंदू बाबाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. "तुझ्यावर भूतबाधा झाली आहे," असे सांगून तांत्रिक विधी करून ती दूर करता येते, असे त्याने महिलेला पटवून दिले. तिच्या त्रासाचा गैरफायदा घेत त्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कथित उपचारासाठी तिला एका ठिकाणी बोलावले.

‘उपचाराचा’ गैरसमज आणि फसवणूक

तांत्रिक विधीचे नाटक करून आरोपी अब्दुल रशीदने महिलेवर बलात्कार केला. सुरुवातीला पीडित महिलेला हा एक उपचाराचाच भाग असावा, असा गैरसमज झाला होता. परंतु, नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने लगेच मंगळवारी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अब्दुल रशीदला बुधवारी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 आणि 64 (2) अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्याच्या (अंधश्रद्धाविरोधी कायदा) कलमांअंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा अशा भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता योग्य आणि वैज्ञानिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Raj Thackeray Meet Devendra Fadnavis : बेस्टच्या पराभवानंतर राज ठाकरेंची फडणवीसांना भेट; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर दिला आराखडा!

शेअर करा