मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : अवघ्या 5 रुपयांच्या शुल्काच्या नावाखाली सायबर भामट्यांचा मोठा घात; निवडणूक आयोगाचा अधिकारी बनून वृद्ध नागरिकाचे साडेसहा लाख लाटले

•मतदार ओळखपत्रावरील नाव दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून बँकेचा गोपनीय कोड मिळवला; मुंबईतील मालाडमधील धक्कादायक प्रकार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

•मतदार ओळखपत्रावरील नाव दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून बँकेचा गोपनीय कोड मिळवला; मुंबईतील मालाडमधील धक्कादायक प्रकार

मुंबई :- मुंबईत सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून भामट्यांनी आता थेट निवडणूक आयोगाच्या नावाचा गैरवापर करत नागरिकांना गंडवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. मतदार ओळखपत्रावरील (Voter ID) नावामध्ये किरकोळ दुरुस्ती करून देण्याच्या बहाण्याने एका सायबर ठगाने निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याची बतावणी केली आणि 79 वर्षीय वृद्ध नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल 6 लाख 48 हजार 17 रुपये ऑनलाईन लाटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 रुपयांच्या ऑनलाइन शुल्काचा बहाणा अन् बँक खात्याचा ताबा

मालाड पश्चिमेकडील इव्हरशाइन नगर परिसरात राहणारे रामनाधम फनिंद्र काजा (79 वय) हे सेवानिवृत्त वृद्ध दांपत्य बँक बचतीवर आपला उदरनिर्वाह चालवतात. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण भारतीय निवडणूक आयोगाचा (Election Commission) अधिकारी असल्याचे भासवून काजा आणि त्यांच्या पत्नीच्या ओळखपत्रातील नावात दुरुस्ती करायची असल्याचे सांगितले. यासाठी केवळ 5 रुपयांचे ऑनलाइन शुल्क भरावे लागेल, असे सांगत भामट्याने विश्वासात घेऊन त्यांच्याकडून बँकेच्या मोबाईल ॲपशी संबंधित गोपनीय कोड (Code) मिळवला.

खात्यातून रक्कम काढल्यानंतर वृद्धाची फसवणूक उघड

गोपनीय कोड हाती लागताच काही मिनिटांतच काजा यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातून 6 लाख 48 हजार 17 रुपयांची मोठी रक्कम परस्पर वळती करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित वृद्धाने तात्काळ बांगुरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. निवडणुकीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या अशा भामट्यांचा शोध घेण्यासाठी आता सायबर पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : "संध्याकाळी या, कसं कंपल्सरी करतात ते बघतो!"; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक, साई डोंगरावर प्रत्यक्ष पाहणी

शेअर करा