मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : 'तोतया' पोलिसांकडून व्यापाऱ्याची 10 लाखांची फसवणूक!

• वांद्रे स्थानकावर घडला प्रकार; दोन आरोपींना अटक, खरे रेल्वे पोलीस सहभागी आहेत का, तपास सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : 'तोतया' पोलिसांकडून व्यापाऱ्याची 10 लाखांची फसवणूक!

• वांद्रे स्थानकावर घडला प्रकार; दोन आरोपींना अटक, खरे रेल्वे पोलीस सहभागी आहेत का, तपास सुरू

मुंबई :- मुंबई आणि वसईमध्ये रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची लूट झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता वांद्रे रेल्वे स्थानकावर दोन तोतया पोलिसांनी एका व्यापाऱ्याची 10 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून, यामागे खरे पोलीस आहेत का, याचा तपास सुरू आहे.

नेमका प्रकार काय?

मालाड येथे राहणारे व्यावसायिक विकास गुप्ता हे कपड्यांच्या खरेदीसाठी सोमवारी गुजरातला जाण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आले होते. रेल्वे कॅन्टीनजवळ उभे असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून त्यांना अडवले. "कुठे जात आहात?" आणि "तुमच्या बॅगेत काय आहे?" अशी विचारणा त्यांनी केली.

बॅगेची तपासणी केली असता, त्यात 10 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम आढळली. आरोपींनी गुप्ता यांच्याकडे या रकमेचा पुरावा मागितला. त्यावेळी पुरावा नसल्याने गुप्ता घाबरून गेले. याचा फायदा घेत आरोपींनी ती रक्कम ताब्यात घेतली आणि ती परत मिळणार नाही असे सांगून तेथून पळ काढला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

दोघे आरोपींना अटक

गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणी निलेश कळसुलकर (वय 45) आणि प्रवीण शुक्ला (वय 32) या दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना लोहमार्ग पोलीस, पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त सुनीता ठाकरे यांनी सांगितले की, "आम्ही तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून, यात खरे रेल्वे पोलीस समाविष्ट आहेत का, याचा तपास सुरू आहे."

हेही वाचा: Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, प्रकृती नाजूक असल्याने रुग्णालयात दाखल

शेअर करा