मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : सायबर पोलीस ठाणे, उत्तर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई यांची कारवाई ; हेवी डिपॉझिट वर घर देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

घर खरेदी/विक्री/भाडेतत्व यासंदर्भातील इंटरनेटवरील वेबसाईटव्दारे इस्टेट एजंट असल्याची जाहिरात करून लाखो रूपयांचा अपहार करणाऱ्या सराईत सायबर गुन्हेगारांची टोळीस अटक

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Crime News

घर खरेदी/विक्री/भाडेतत्व यासंदर्भातील इंटरनेटवरील वेबसाईटव्दारे इस्टेट एजंट असल्याची जाहिरात करून लाखो रूपयांचा अपहार करणाऱ्या सराईत सायबर गुन्हेगारांची टोळीस अटक

मुंबई :- घर खरेदी विक्री व नंतर ती भाडेतत्वावर देण्याच्या गुंतवणूकीकरीता वेबसाईटवरील 'मीरारोड परिसरात हेवी डिपॉझिटवर फ्लॅट' या 'ग्लोबल्स होम बेस्ट सर्विस' ची जाहिरात पाहून त्यामध्ये इस्टेट एजंट च्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता, यातील आरोपी व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना ते इस्टेट एजंट आहेत असे भासवून व फिर्यादीस मीरारोड, वसई, नालासोपारा परिसरातील वेगवेगळया फ्लॅटचे फोटो व्हॉटसअपव्दारे पाठवून हेवी डिपॉझिट साठी व्यवहाराची रक्कम विविध बँक खाती भरती करण्यास भाग पाडले. तसेच सदर गुन्हयातील सायबर आरोपींनी स्वतः फ्लॅटचे मालक, भाडेकरू असल्याचा बनाव करून सदरची रक्कम स्वतःव्या व इतरांच्या नावे असलेल्या बैंक खाती स्विकारून फिर्यादी यांची एकूण 22 लाख 31हजारची फसवणूक केली.

फिर्यादी यांनी (7 मार्च) रोजी कांदिवली, मुंबई येथे राहणारे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कलम 120 (बी), 419,420,465,467,471 भा.द.वि सह कलम 66 (क), 66 (ड) अन्वये नोंद करण्यात आला आहे.त्यादृष्टीने गुन्हयाचा सखोल तांत्रिक तपास केला असता गुन्हयातील आरोपी हे नालासोपारा, वसई परिसरात आपला ठावठिकाणा बदलून आपले अस्तित्व लपवून वास्तव्यास असल्याचे निष्पण्ण झाल्याने तपास पथकाने सदर परिसरात पाहिजे आरोपीतांचा अथक शोध घेवून सदर गुन्हयातील सक्रिय मुख्य आरोपीतांना अटक केले.

नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे,

1) हौशिला उर्फ शिवा शिवकुमार शुक्ला, (27 वर्षे),

2) योगेश दुलेराय करवट, (55 वर्षे),

3) विशाल राजनाथ यादव (29 वर्षे),

अटक आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये असे निदर्शनास आले की, त्यांनी इस्टेट एजंट, घर मालक असल्याचा बनाव करून इंटरनेटवरील नामांकित वेबसाईटवर घर, फ्लॅट खरेदी विक्री/भाडेतत्व संदर्भात जाहिरात प्रदर्शित करून सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात येवून घर, फ्लॅट खरेदी विक्री/भाडेतत्व व्यवहाराच्या बहाण्याने विविध बैंक खाती रक्कम भरणा करण्यास भाग पाडून लाखो रूपयांचा अपहार करणारे सराईत आरोपी आहेत.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मीना, पोलीस उप आयुक्त, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनावणे, प्रकटीकरण पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचांगणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, ‍पोलीस हवालदार नलावडे, सावंत,पावस्कर, परब, वसईकर, पोलीस शिपाई हबीब सय्यद यांनी पार पाडली आहे.

पोलीसांकडून नागरिक आवाहन
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा ऑनलाईन फसव्या जाहिरातींना बळी न पडता अथवा त्यांची पडताळणी न करता कोणतेही आर्थिक व्यवहार करून नयेत. हेवी डिपॉझिट करीता व्यवहार करताना संबंधित प्रॉपर्टीची शहानिशा करावी.

शेअर करा