मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : फेसबुकवरील खेळ जीवावर बेतला, 79 वर्षीय वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

•‘1 कोटींचे बक्षीस’ लागल्याचे आमिष, सायबर ठगांनी वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळले; उत्तर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : फेसबुकवरील खेळ जीवावर बेतला, 79 वर्षीय वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

•‘1 कोटींचे बक्षीस’ लागल्याचे आमिष, सायबर ठगांनी वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळले; उत्तर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई :- फेसबुकवर एक साधा खेळ खेळणे एका 79 वर्षीय वृद्धेला चांगलेच महागात पडले आहे. ‘1 कोटींचे बक्षीस लागले आहे’ असे आमिष दाखवून सायबर ठगांनी तिच्याकडून तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी उत्तर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव येथील मूळ रहिवासी असलेली ही वृद्ध महिला सध्या कांदिवलीच्या चारकोप येथे राहत आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्या फेसबुक वापरत असताना त्यांना एका खेळाची जाहिरात दिसली. गंमत म्हणून त्यांनी त्यातील प्रश्नांची उत्तरे दिली, जी अचूक ठरली. त्यानंतर 'हेडगे फंड मॅनेजर' नावाच्या कंपनीतून त्यांना फोन आला. तुम्हाला 100 दशलक्ष (1 कोटी) रुपयांचे बक्षीस लागले असल्याचे सांगण्यात आले.

या वृद्धेचा मुलगा पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असल्यामुळे त्यांना पैशांची तातडीची गरज होती. त्यामुळे, 1 कोटी रुपये मिळणार असल्याचे ऐकून त्यांना आनंद झाला. ठगांनी त्यांना एक लिंक पाठवून ‘प्रक्रिया शुल्क’ (प्रोसेसिंग फी) म्हणून 75 हजार रुपये भरण्यास सांगितले. ऑनलाइन व्यवहारांची माहिती नसल्याने वृद्धेने ओळखीतून पैसे उसने घेऊन ठगांनी दिलेल्या बँक खात्यात भरले.

28 एप्रिल ते 21 जून या काळात 1 कोटी मिळतील या आशेवर त्यांनी थोडे थोडे करून एकूण 21 लाख 23 हजार 700 रुपये खात्यात भरले. तरीही ठग आणखी पैशांची मागणी करत होते. अखेर त्यांच्या एका मैत्रिणीला यावर संशय आला आणि तिने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे सांगितले. जेव्हा वृद्धेने पुन्हा फोन केला, तेव्हा ठगांनी तिचे ॲप बंद झाल्याचे सांगून पुढील पैसे मिळणार नाहीत असे स्पष्ट केले.

या गंभीर प्रकारामुळे वृद्ध महिलेचे घरात साठवलेले आणि उसने घेतलेले असे एकूण 21 लाख रुपये वाया गेले. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 25 लाखांचा ई-सिगारेटचा साठा जप्त

शेअर करा