मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Bomb Threat : मुंबईतील रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी; निनावी फोनमुळे खळबळ, पोलिसांनी तपासणी केली

Mumbai Latest Bomb Threat Call : धमकीचा फोन अफवा असल्याचे स्पष्ट; फोन करणाऱ्याचा शोध सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Bomb Threat : मुंबईतील रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी; निनावी फोनमुळे खळबळ, पोलिसांनी तपासणी केली

Mumbai Latest Bomb Threat Call : धमकीचा फोन अफवा असल्याचे स्पष्ट; फोन करणाऱ्याचा शोध सुरू

मुंबई :- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वे स्थानके आणि लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा एक निनावी फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी हा दूरध्वनी पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षात आला होता. यानंतर, पोलिसांनी तात्काळ सर्व रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. Mumbai Latest Bomb Threat Call

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून "मुंबईतील रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि लवकरच स्फोट घडविण्यात येणार आहे," अशी माहिती दिली. त्यानंतर तात्काळ त्याने फोन ठेवला. पोलिसांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी अधिक असल्याने, हा दूरध्वनी गांभीर्याने घेण्यात आला. फोन करणाऱ्याने नेमके ठिकाण सांगितले नव्हते, फक्त 'मुंबई रेल्वे' असा उल्लेख केला होता. त्यामुळे सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रात्रभर सर्व प्रमुख स्थानके आणि लोकल गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली.

तपासाअंती, पोलिसांना कोणत्याही ठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे हा दूरध्वनी एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शाळा, शासकीय कार्यालये आणि दूतावासांना अशाच प्रकारे धमक्या येत असल्याने पोलिसांनी हा फोनही एक 'प्रॅंक कॉल' मानला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या बंदोबस्तात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील तपास सुरू असून, फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

शेअर करा