मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबई पालिकेचे शिवडीत 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान; अनधिकृत दुकाने अन् फेरीवाल्यांवर चालवला बुलडोझर!'

Mumbai News :मुंबई :- मुंबईतील पदपथांवरून पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ (पादचारी प्रथम) हे विशेष अभियान राबवले जात आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मुंबई पालिकेचे शिवडीत 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान; अनधिकृत दुकाने अन् फेरीवाल्यांवर चालवला बुलडोझर!'
मुंबई पालिकेचे शिवडीत 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान; अनधिकृत दुकाने अन् फेरीवाल्यांवर चालवला बुलडोझर!'

Mumbai News :'डी. जी. महाजनी व जेरबाई वाडिया मार्गावरील अतिक्रमणांवर एफ-दक्षिण विभागाची धडक कारवाई; पदपथ झाले मोकळे'

Mumbai News :मुंबई :- मुंबईतील पदपथांवरून पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ (पादचारी प्रथम) हे विशेष अभियान राबवले जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी एफ-दक्षिण विभागाच्या हद्दीतील शिवडी परिसरामध्ये पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

7 अनधिकृत दुकाने, ताडपत्री शेड अन् 20 फेरीवाल्यांवर हातोडा

उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एफ-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिवडी येथील डी. जी. महाजनी मार्ग आणि जेरबाई वाडिया मार्गावर ही कारवाई केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात राबवलेल्या या मोहिमेत

7 अनधिकृत दुकाने आणि 2 अनधिकृत कट्टे तोडण्यात आले.

15 तात्पुरते ताडपत्रीचे शेड हटवण्यात आले.

4 बेवारस साहित्य साठवण ठिकाणे जप्त करण्यात आली.

पदपथ अडवून बसलेल्या 20 फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा महापालिकेचा इशारा

पादचाऱ्यांच्या हक्काचे रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवण्यासाठी महापालिकेकडून ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र केली जाणार आहे. पदपथांवर अडथळा निर्माण होईल असे कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये किंवा बेकायदा साहित्य ठेवून रस्ता अडवू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सडेतोड इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा