मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai BMC Election : महापालिका निवडणुकांचा 'क्लायमॅक्स'! आज प्रचाराची रणधुमाळी थांबणार; गुरुवारी 15 जानेवारीला 'महा-मतदान'

Mumbai BMC Election Update : पुणे, मुंबई, नागपूरसह २९ शहरांत हायव्होल्टेज प्रचार; ,5.30 वाजता राजकीय तोफा थंडावणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai BMC Election : महापालिका निवडणुकांचा 'क्लायमॅक्स'! आज प्रचाराची रणधुमाळी थांबणार; गुरुवारी 15 जानेवारीला 'महा-मतदान'

Mumbai BMC Election Update : पुणे, मुंबई, नागपूरसह २९ शहरांत हायव्होल्टेज प्रचार; ,5.30 वाजता राजकीय तोफा थंडावणार

मुंबई/पुणे | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा आणि लाऊडस्पीकरचा आवाज बंद होईल. त्यानंतर सुरू होईल तो 'गुतगुती'चा आणि भेटीगाठींचा काळ. मुंबईच्या 227, पुण्याच्या 163 आणि नागपूरच्या 156 जागांसह राज्यातील एकूण 2,869 जागांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेत्यांची फळी मैदानात

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात जाहीर सभा घेऊन ताकद अजमावणार आहेत. दुसरीकडे, अजित पवार यांचा शहरात भव्य रोड शो होणार असून, राज ठाकरे यांच्या पुणे मुक्कामामुळे मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

नागपूर: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुचाकीवरून रोड शो करत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

मुंबई: 'ठाकरे युती' (UBT + मनसे) आणि 'महायुती' (भाजप + शिंदे + अजित पवार) यांच्यात मुंबईत काटाजोड लढत असून, आज शेवटच्या दिवशी सोशल मीडिया आणि पदयात्रांवर भर दिला जात आहे.

निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी

1.सार्वजनिक सुट्टी: मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 15 जानेवारी रोजी मुंबई, पुणे आणि इतर निवडणूक क्षेत्रांत राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

2.पोलीस बंदोबस्त: पुण्यात 12 हजार, तर मुंबईत 50 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर राज्य राखीव दलाची (SRPF) मदत घेतली जात आहे.

3.मतदान वेळ: सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडेल.

शेअर करा