मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mulund Crime News : मुलुंड हादरले! बोलणे बंद केल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी आशिष बनसोडला बेड्या

• बदलापूरचा सिरियल गुन्हेगार अटकेत; मुलीच्या मित्रावरही वार करून दिली जीवे मारण्याची धमकी

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thane Murder News

•बदलापूरचा सिरियल गुन्हेगार अटकेत; मुलीच्या मित्रावरही वार करून दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई :- मुंबईतील मुलुंड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ बोलणे बंद केले आणि टाळले, या रागातून बदलापूर येथील एका तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिच्या मित्रावरही आरोपीने वार केले आहेत. मुलुंड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आशिष बनसोड याला शस्त्रासह अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी हे दोघेही बदलापूरचे रहिवासी असून त्यांची जुनी ओळख होती. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने गेल्या काही दिवसांपासून आशिषशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. याचाच राग मनात धरून आशिषने तिचा पाठलाग केला. मुलगी मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ असताना, आशिषने तिला गाठले आणि सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने थेट तिच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

मित्रावरही हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी

यावेळी मुलीसोबत असलेल्या तिच्या एका मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या आशिषने त्याच्यावरही कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तेथेच सोडून "पुन्हा दिसलात तर जीवे मारीन," अशी धमकी देत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी वेगाने हालचाली करून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

पोलिस तपासात समोर आले आहे की, अटक करण्यात आलेला आशिष बनसोड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. बदलापूरमधून मुलुंडमध्ये येऊन त्याने हा कट रचल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला असून, दोन्ही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कॉलेजबाहेर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलुंड पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, अशा विकृत मानसिकतेच्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा: Satara News : सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे नाट्य संपले; 'त्या' गोंधळानंतर दोशी पुन्हा खुर्चीवर, कार्यालयात हजर

शेअर करा