मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mulund Crime News : मुलुंड पोलिसांची मोठी कामगिरी; आंतरराज्यीय सायबर गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करत देशभरातील 255 गुन्हे उघडकीस, 6 जणांना अटक

•आरोपींच्या मोबाईल विश्लेषणातून तब्बल 72 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे बिंग फुटले; मोबाईल जप्त

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mulund Crime News : मुलुंड पोलिसांची मोठी कामगिरी; आंतरराज्यीय सायबर गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करत देशभरातील 255 गुन्हे उघडकीस, 6 जणांना अटक

•आरोपींच्या मोबाईल विश्लेषणातून तब्बल 72 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे बिंग फुटले; मोबाईल जप्त

मुंबई :- मुलुंड येथील एका खाजगी कंपनीतील अकाउंटंटच्या मोबाईल हॉटस्पॉटवर 30 जुलै 2026 रोजी एका अज्ञात मोबाईलधारकाने कंपनी मालकाचा फोटो ठेवून स्वतः मालक असल्याचा बनाव केला. या भामट्याने कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल 10 लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यावर वळवून फसवणूक केली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) सह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्याचा कसून तपास करत असताना पोलिसांनी बँक व्यवहारांचे व मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. फसवणुकीची ही रक्कम उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. यावरून मुलुंड पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधून 3 जणांना अटक केली. त्यानंतर सखोल तपास केला असता गाझियाबाद येथून 1, वडोदरा येथून 1 आणि कांदिवली, मुंबई येथून 1 अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात यश आले. आरोपींकडून फसवणुकीची 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

देशभरात 72 कोटी रुपयांची फसवणूक; गुन्हे करण्याची होती भयंकर पद्धत

पोलीस तपासात या टोळीचे मोठे जाळे समोर आले आहे. अटक आरोपींपैकी एका आरोपीच्या मोबाईलमधील 11 बँक खात्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून देशातील 21 राज्यांमध्ये तब्बल 182 सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दुसऱ्या एका अटक आरोपीकडे 49 बँक खात्यांची माहिती मिळाली असून त्या खात्यांवर देशभरात 73 सायबर तक्रारी नोंद आहेत. या सर्व सायबर तपासातील आरोपींकडून केलेल्या फसवणुकीची एकूण रक्कम अंदाजे 72 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.

ही टोळी टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून सायबर

फसवणुकीसाठी बँक खाती आणि सिमकार्डची देवाणघेवाण करत असे. बँक खातेधारकांच्या मोबाईलमध्ये APK फाइल इन्स्टॉल करून त्यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवला जायचा. तसेच फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सी (USDT) मध्ये रूपांतरित करून काढली जात असे. नागरिकांनी आपले बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड कोणालाही वापरास देऊ नये आणि कोणतीही अनधिकृत APK फाइल इन्स्टॉल करू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: Today's Weather Update : हवामान खात्याचा मोठा इशारा; 'अर्णब' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ, कोकण आणि मुंबईसाठी हाय अलर्ट जारी

शेअर करा