मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : एसटीच्या ताफ्यात लवकरच २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

Mumbai news : मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

एसटीच्या ताफ्यात लवकरच २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मिळणार आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाचा पर्याय
एसटीच्या ताफ्यात लवकरच २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मिळणार आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाचा पर्याय

Mumbai News : लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मिळणार आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाचा पर्याय


Mumbai news : मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान (स्लीपर) बसेसचा समावेश आहे. एसटीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने स्वमालकीच्या व्होल्वो बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत.Mumbai news https://maharashtramirror.com/
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रवाशांना आधुनिक सुविधा, आरामदायी प्रवास आणि दर्जेदार सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. Mumbai news https://maharashtramirror.com/

दिवसा ४५ आसनी आरामदायी बसेस


२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आणि साधारण पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ४५ आसनी वातानुकूलित आरामदायी बसेस चालविण्याचे नियोजन आहे. या बसेसमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आरामदायी आसने आणि वातानुकूलित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर बसेस
रात्रीच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी खासगी बससेवेला एसटीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मोबाईलवरून तिकीट आरक्षण
नव्या बससेवेसाठी एसटीच्या ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. प्रवाशांना मोबाईलवरून मार्ग, प्रवासाची वेळ आणि उपलब्ध आसनांची माहिती पाहून तिकीट आरक्षित करता येणार आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ
बसेसची स्वच्छता, प्रवाशांचे स्वागत, मार्गदर्शन आणि इतर सेवा-सुविधांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
प्रवासी मागणीनुसार मार्ग निश्चित होणार
महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवरील प्रवासी मागणीचा अभ्यास करून नव्या व्होल्वो बसेसचे मार्ग निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या मार्गांवर लांब पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी मागणी आहे, त्या मार्गांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी आसने, वातानुकूलित सुविधा आणि स्लीपर बससेवेच्या माध्यमातून एसटीच्या लांब पल्ल्याच्या सेवेला नवे स्वरूप देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा