Mumbai News : एमपीएससी भरती परीक्षा रद्द
Mumbai News : मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 मिनिट वाचन

Mumbai News: अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक भरती
Mumbai News : मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनियमितता आढळून आली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक अहवालानुसार, परीक्षेपूर्वी एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाला होता आणि त्याचा त्याला फायदा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परीक्षेची पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
उमेदवारांसाठी दिलासा म्हणजे फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही तसेच कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर झाला होता आणि मुलाखतीची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र पेपरफुटीच्या तक्रारी व तपासाचा अहवाल समोर आल्यानंतर आयोगाने हा कठोर निर्णय घेतला. https://maharashtramirror.com/ Mumbai News




