मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MNS Ramdas Patil : आरोपीना भर चौकात फाशी द्या - मनसे तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील

पनवेल जितिन शेट्टी : उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख ,नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे Akahsta Murder हत्याकांडातील आरोपीना भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस कोण करणार नाहीत अशी मागणी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील MNS Ramdas Patil यांच्या नेतृत्वा

V
Vivek

1 मिनिट वाचन

MNS Ramdas Patil : आरोपीना भर चौकात फाशी द्या - मनसे तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील

पनवेल जितिन शेट्टी : उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख ,नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे Akahsta Murder हत्याकांडातील आरोपीना भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस कोण करणार नाहीत अशी मागणी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील MNS Ramdas Patil यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना निवदेन देण्यात आले . Panvel Latest News

शासनापर्यंत जनसामान्यांच्या प्रतिक्रिया पोहचाव्या जेणेकरून शासन तज्ज्ञ असे सरकारी वकील देऊन यशश्री शिंदे आणि नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार,हत्याकांडाबाबत आरोपीना लवकरत लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हि फाशी भर चौकात देण्यात यावी ज्यामुळे भविष्यात आपल्या माता भगिनींवर असे प्रकार करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही असे मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी यावेळी सांगितले. Panvel Latest News

याबाबत पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी यावेळी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली या मोर्चाप्रसंगी मनसे कोकण संघटक संजय तन्ना,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार उपाध्यक्ष मनीषा पाच भाई रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर पनवेल तालुका सचिव अमोल पाटील,उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी, अभिजित घरत, स्वरूपा सुर्वे मनसे नेते अतुल चव्हाण यासह महिला पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Panvel Latest News

शेअर करा