मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी सुरक्षारक्षकाला मनसे स्टाईल इंगा

MNS : एका सुरक्षारक्षकाला मराठी येत नाही म्हणून मनसेच्या नेत्यांनी मारहाण केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mansainik Beat Larsen And Toubro Ltd L&T Security Guard In Powai

MNS : एका सुरक्षारक्षकाला मराठी येत नाही म्हणून मनसेच्या नेत्यांनी मारहाण केली. मराठी माणसाशी झालेल्या वादानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. "मराठी भाषा गयी तेल….."

मुंबई :- महाराष्ट्रात मराठी भाषेचा वाद थांबत नाही. आता याबाबत राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. मराठी येत नसल्याने मनसेच्या नेत्यांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. Mansainik Beat Larsen And Toubro Ltd L&T Security Guard In Powai सुरक्षा रक्षकाने मराठी माणसांसोबत उद्धटपणे वर्तवणूक करून मराठी भाषेला अपमानित करणारे शब्द वापरले. सुरक्षारक्षकाने मराठी गयी तेल लगाने… असे शब्द वापरल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी सुरक्षारक्षकाला चांगला चोप दिला आहे.

ही घटना पवई परिसरात घडली असून, त्याचा व्हिडिओही समोर येत आहे. मनसे नेते सुरक्षारक्षकाला जोरदार कानाखाली मारत असून एक व्यक्ती व्हिडिओ बनवताना दिसत आहे. सुरक्षा रक्षक मराठी न बोलून मराठी भाषेचा अपमान करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पवई येथील एल अँड टी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा एका मराठी माणसाशी वाद झाला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. कारण सुरक्षा रक्षक उत्तर भारतातील असल्याने त्याला मराठी बोलता येत नव्हते. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण केली, तर सुरक्षा रक्षक म्हणतच राहिला की, त्याला मराठी येत नसेल तर बोलणार कसे?

तुम्हाला मराठी येत नसेल तर लवकर शिका आणि शांतपणे बोला, असे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 'मराठी गया तेल लागणे' म्हणत त्याने मराठी भाषेचा अपमान केल्याने सुरक्षा रक्षकाला मारल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

शेअर करा