मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MLC Election Result 2026 : बॅलेट पेपरवर झालेल्या विधानपरिषद (MLC) निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ; महाराष्ट्र, बिहारसह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्येही पराभवाचा सामना

•चार राज्यांतील 28 पैकी 12 जागांवर नशीब आजमावूनही काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही; भाजपचे 14 जागांवर दणदणीत यश

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLC Election Result 2026 : बॅलेट पेपरवर झालेल्या विधानपरिषद (MLC) निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ; महाराष्ट्र, बिहारसह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्येही पराभवाचा सामना

•चार राज्यांतील 28 पैकी 12 जागांवर नशीब आजमावूनही काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही; भाजपचे 14 जागांवर दणदणीत यश

मुंबई :- देशभरात गाजलेल्या चार राज्यांमधील विधानपरिषद (MLC) निवडणुकांच्या निकालानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमधील विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने एकूण 12 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते; परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वच्या सर्व 12 जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. विशेष म्हणजे, ज्या कर्नाटकात सध्या काँग्रेसचा स्वतःचा पक्षीय प्रभाव आणि सरकार आहे, तिथेही त्यांना खाते उघडता आले नाही.

बॅलेट पेपरवरील निवडणुकीतील निकालांवरून राजकीय वर्तुळात चर्चा

देशभरात सातत्याने 'बॅलेट पेपर'वर निवडणुका घेण्यात याव्यात अशी आक्रमक मागणी करणाऱ्या काँग्रेससाठी बॅलेट पेपरवरच पार पडलेल्या या विधानपरिषद निवडणुकांचे निकाल मोठे आत्मचिंतन करायला लावणारे ठरले आहेत. महाराष्ट्रात 3, बिहारमध्ये 5 आणि कर्नाटकात 4 अशा एकूण 12 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाला चारही राज्यांत मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे, भाजपने एकूण 22 जागांवर निवडणूक लढवत तब्बल 14 जागांवर आपली विजयी पताका फडकावली आहे आणि घवघवीत यश संपादन केले आहे.

पक्षांतर्गत नेत्यांकडून नाराजी व्यक्त; जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

या पराभवानंतर आता काँग्रेस पक्षांतर्गत नेत्यांकडूनच खंत आणि नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. बिहार आणि इतर राज्यांमधील या निकालांवर बऱ्याच नेत्यांनी प्रश्न उपस्थित करत पक्षाच्या धोरणांवर आणि अयोग्य उमेदवारांच्या निवडीवर ताशेरे ओढले आहेत. एका बाजूला मविआ आणि महायुतीमधील स्थानिक आघाड्यांचे राजकारण तापलेले असताना, राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या या कामगिरीमुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा: Nitesh Karale : नागपूर पदवीधर निवडणुकीत नितेश कराळे यांना 24 हजारांहून अधिक मते; हकालपट्टीनंतर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर

शेअर करा