मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Sun Spa Center Busted : 'सन स्पा सेंटर'वर मिरारोड पोलिसांची मोठी कारवाई; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

• गरिबीचा फायदा घेऊन महिलांना वेश्याव्यवसायासाठी केले जात होते प्रवृत्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News: 15-year-old girl commits suicide after being unable to bear the stress of studies; ends life by jumping from the 31st floor

•गरिबीचा फायदा घेऊन महिलांना वेश्याव्यवसायासाठी केले जात होते प्रवृत्त

मीरा रोड :- मीरा रोड पूर्वेकडील हाटकेश परिसरातील 'सन स्पा सेंटर' नावाच्या मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या सेंटरमध्ये महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना मसाजच्या नावाखाली वेश्यागमनासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुप्त माहितीच्या आधारे मीरा रोड पोलिसांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी कायदेशीर बाबी पूर्ण करून 'सन स्पा सेंटर'वर छापा टाकला. पोलीस पथकाने केलेल्या तपासणीत सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हा दाखल आणि आरोपींना अटक

या कारवाईनंतर पोलिसांनी तातडीने अलादीन ऊर्फ अलम हमीद शेख (वय 35), व्यवस्थापक स्वप्निल अरुण खरात (वय 27) आणि स्टाफमधील योगश गणेश रावल (वय 26) अशा तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिरारोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सय्यद जिलानी (क्राईम) यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा: Bhiwandi News : भिवंडीमध्ये ठाणे पोलिसांची नवी ताकद – फॉरेन्सिक युनिट आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे धमाकेदार उद्घाटन!

शेअर करा