मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Spa Sex Racket : "स्पा"च्या आड नरकयात्रा! – सेक्स रॅकेटवर धाड, चार मुलींची सुटका

•Viva Spa मध्ये ‘लक्झरी मसाज’च्या नावाखाली शरीरविक्रयाचा घिनौणा खेळ!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mira Road Spa Sex Racket : "स्पा"च्या आड नरकयात्रा! – सेक्स रॅकेटवर धाड, चार मुलींची सुटका

•Viva Spa मध्ये ‘लक्झरी मसाज’च्या नावाखाली शरीरविक्रयाचा घिनौणा खेळ!

मिरारोड | मसाज पार्लरच्या आड मुलींचा सौदा करणाऱ्या 'रॉयल द लक्झरी (Viva) स्पा'वर मिरा-भाईंदर पोलिसांच्या विशेष पथकाने थरारक धाड टाकून चार पीडित मुलींची सुटका केली. Mira Road Spa Sex Racket सौंदर्य उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या या ‘वास्तविक नरकयात्रे’चा पर्दाफाश पोलिसांच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे उघडकीस आला.

विशेष माहितीवरून 17 जुलै रोजी संध्याकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि नंतर स्पावर छापा टाकला. या छाप्यात ‘डील’ ठरवून सेक्ससाठी जागा पुरवणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. Mira Road Spa Sex Racket

या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 45,380 रुपये रोख रक्कम आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. Mira Road Spa Sex Racket

प्राप्त माहितीनुसार, या स्पामध्ये 7,500 रुपयांच्या मोबदल्यात ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 17 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास बनावट ग्राहक आणि पंचांसह सापळा रचून छापा टाकण्यात आला. Mira Road Spa Sex Racket

अटक आरोपी

गोविंद उर्फ मुन्ना अर्जुन सिंग (वय 28) – स्पा चालक, सध्या रा. पुनम सृष्टी, मिरारोड पूर्व

नसीम युसुफ शेख (वय 34) – स्पा मॅनेजर, सध्या रा. आंबावाडी, दहिसर पूर्व

या आरोपींनी स्पा मसाजच्या नावाखाली चार पीडित मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची कबुली तपासात दिली. त्यांच्याविरोधात IPC 2023 चे कलम 143(3), 3(5) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकारी आणि पथक:
ही कारवाई संदीप डोईफोडे (पोलीस उप आयुक्त - गुन्हे) आणि मदन बल्लाळ (सहायक पोलीस आयुक्त - गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पु.नि. देविदास हंडोरे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, चेतनसिंग राजपूत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, तसेच लतादेवी एक्कलदेवी (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांनी संयुक्तरीत्या केली. Mira Road Spa Sex Racket

हेही वाचा: Rahul Narvekar : विधिमंडळात फक्त सदस्य व अधिकृत कर्मचारीच! अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय

शेअर करा