मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : सोन्याच्या चेनसाठी वृद्धाचा खून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; आरोपी सलून चालक अटकेत

•मिसिंग व्यक्तीचा शोध सुरू असताना सीसीटीव्हीमुळे उकल; मृतदेह गटारात टाकल्याची आरोपीची कबुली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai: Brutal murder of a minor girl!

•मिसिंग व्यक्तीचा शोध सुरू असताना सीसीटीव्हीमुळे उकल; मृतदेह गटारात टाकल्याची आरोपीची कबुली

मीरा रोड :- सोन्याची चेन लुबाडण्याच्या उद्देशाने एका 75 वर्षीय वृद्धाचा खून करून मृतदेह गटारात फेकून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोडमध्ये उघडकीस आला आहे. काशिमीरा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सलून चालकाला अटक केली आहे.

16 सप्टेंबर 2025 रोजी विठ्ठल बाबुराव तांबे (वय 75) हे हरवल्याची तक्रार त्यांचा मुलगा समीर तांबे यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांचे पथक हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना, त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये विठ्ठल तांबे हे एका सलूनमध्ये प्रवेश करताना दिसले. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान आरोपी सलूनमधून मृतदेह फरफटत नेत असल्याचेही दिसून आले.

कौशल्यपूर्ण तपासाने आरोपीला बेड्या

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलून चालक अशफाक इशाक शेख (वय 39) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने सांगितले की, विठ्ठल तांबे हे त्यांच्या सलूनमध्ये आले होते. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून त्याने त्यांना थांबवून घेतले. सलूनमध्ये कोणीही ग्राहक नसल्याचे पाहून, त्याने टॉवेलने त्यांचे तोंड दाबून गळा आवळला आणि त्यांना ठार मारले. त्यानंतर त्याने त्यांची सोन्याची चेन काढून घेतली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मध्यरात्री मृतदेह जवळच्या गटारात फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अशफाक शेख याला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103,238,309,(6) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शितल मुंडे करत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हेही वाचा: Pune News : पडळकरांच्या विरोधात पुण्यात फलकबाजी; ‘सडकछाप नेता’, ‘संस्कार करायला बाप कमी पडला’ असे फलक चर्चेत

शेअर करा