मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : Credit card वरुन ऑनलाईन फसवणूक ; तक्रारदार महिलेचे 98 हजार परत करण्यात सायबर पोलिसांना यश

• Mira Road Crime News क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चोरट्यांचा डल्ला, सायबर पोलिसांची विशेष कामगिरी ऑनलाइन फसवणूक झालेले पैसे परत देण्यास यश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Crime News

•Mira Road Crime News क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चोरट्यांचा डल्ला, सायबर पोलिसांची विशेष कामगिरी ऑनलाइन फसवणूक झालेले पैसे परत देण्यास यश

मिरा रोड :- क्रेडिट कार्डची वैयक्तिक माहिती संकलित करून फसवणूक झाल्याची घटना मिरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीत घडली होती. क्रेडिट कार्डद्वारे महिलेची 98 हजार 940 रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार कोमेंट यांनी सायबर विभागाला तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

Avinash-Ambure

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाच्या सायबर विभागाने त्वरित महिलेची तक्रार करून त्या महिलेची ज्या खात्यावर पैसे गेले होतं ते रक्कम तात्काळ गोठवून खात्यात वर्ग करण्याकरिता पत्रव्यवहार केले त्या अनुषंगाने महिलेचे 98 हजार 940 रुपये मूळ खात्यावर मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक सुजित कुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, अमिना पठाण, सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, जयवंती वसावे पोलीस अंमलदार ओमकार खाटीक या सायबर विभागाच्या पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत महिलेचे फसवणूक झालेले पैसे परत मिळवून देण्यास यशस्वी कामगिरी केली आहे.

हेही वाचा: Online Task Scam Job : ऑनलाइन फसवणूक ; गुगल रेटिंग टास्क पूर्ण केल्यास अधिक चा नफा आमिषाला बळी, सायबर विभागाच्या पोलिसांकडून उत्कृष्ट कामगिरी

शेअर करा