मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदरवर भाजपचे वर्चस्व; विरोध डावलून डिंपल मेहता महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर

• मराठी एकीकरण समितीचे आंदोलन निष्फळ; 79 मतांच्या भक्कम बहुमताने भाजपचा विजय

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदरवर भाजपचे वर्चस्व; विरोध डावलून डिंपल मेहता महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर

•मराठी एकीकरण समितीचे आंदोलन निष्फळ; 79 मतांच्या भक्कम बहुमताने भाजपचा विजय

मीरा-भाईंदर | गेल्या काही दिवसांपासून 'मराठी महापौर' या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. मराठी एकीकरण समितीचा तीव्र विरोध झुगारून भारतीय जनता पक्षाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या डिंपल मेहता यांची 79 मतांनी महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे.

भाजपचे एकगठ्ठा मतदान

निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपने आपली ताकद दाखवून दिली. भाजपचे 78 नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाने हात वर करून डिंपल मेहता यांच्या बाजूने मतदान केले. विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार रुबीना शेख यांना केवळ 16 मते मिळाली. त्यामुळे डिंपल मेहता यांनी 63 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली.

प्रताप सरनाईकांचा मराठी एकीकरण समितीवर प्रहार

या निवडीनंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीवर जोरदार टीका केली. "ही समिती निवडणुकीच्या वेळी कुठे होती? त्यांनी उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 मराठी नगरसेवक पाडले. जर तेव्हा आम्हाला साथ दिली असती, तर आज ही वेळ आली नसती," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच शहरात 80 टक्के अमराठी समाज असून याआधीही गीता जैन आणि नरेंद्र मेहता लोकप्रतिनिधी झाले होते, तेव्हा विरोध का झाला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मराठी महापौरचा मुद्दा का गाजला?

निवडणुकीनंतर मीरा-भाईंदरमध्ये मराठी महापौर असावा, अशी मागणी करत मनसे आणि मराठी एकीकरण समितीने आंदोलन छेडले होते. अमराठी महापौर नको, असा सूर आळवत आज महापालिकेवर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, भाजपने आपल्या बहुमताच्या जोरावर ही मागणी फेटाळून लावत डिंपल मेहता यांच्या नावे शिक्कामोर्तब केले.

शेअर करा