मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Bhayandar Crime News : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रिक्षाचालकाला केले अटक,भाईंदर पोलीसांची कामगिरी

भाईंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; 4 लाख 50 हजार किंमतीची 18 ग्रॅम गर्द पावडर (हेरॉईन) अंमली पदार्थ पकडले .

V
Vivek

2 मिनिट वाचन

Bhayandar Crime News

भाईंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; 4 लाख 50 हजार किंमतीची 18 ग्रॅम गर्द पावडर (हेरॉईन) अंमली पदार्थ पकडले.

मिरा भाईंदर वसई विरारचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 प्रकाश गायकवाड ॲक्शन मोड मध्ये

मिरा भाईंदर :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच बाळगणारे व्यक्ती शोध घेवुन त्यांचेविरुध्द कारवाई करणे बाबत वरीष्ठांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या त्याअनुषंगाने पोलीस उपायुक्त, परिमडंळ 1, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ, अवैध दारु विक्री तसेच गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असतांना भोला नगर जवळ, जे.पी इन्फ्रास्ट्रक्चरचे पुढे, मुकुंदम बिल्डींगचे समोरील बाजूस, भाईंदर (प), येथे नावे 1) गौतम रमेशचंद्र गुप्ता (30 वर्षे) शिवमंदिराच्या मागे, भोला नगर, भाईंदर (प), 2) सचिन उर्फ चटला राधेश्याम गुप्ता (23 वर्ष) शिवमंदिराच्या मागे, भोला नगर, भाईंदर (प), हे व्यक्ती गौतम रमेशचंद्र गुप्ता याचे मालकीचे रिक्षामध्ये संशयितरित्या असतांना मिळून आले त्यांची दोन पंचासमक्ष अंगड़ाडती घेतली असता गौतम रमेशचंद्र गुप्ता याचे शर्टाचे डावे बाजूचे किश्याच्या आतील बाजूस असलेल्या चोर खिश्यामध्ये प्लास्टिकचे पाउचमध्ये 4 लाख 50 हजार रुपये किमंतीचा 18 ग्रॅम वजनाचा गर्द पावडर (हेरॉईन) हा अंमली पदार्थ, रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 61 हजार 420 रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असुन तो जप्त करणेत आला आहे. Mira Bhayandar Crime News

नमूद आरोपींविरोधात भाईंदर पोलीस ठाणे येथे कलम 8 (क), 21(ब) एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणेत आली आहे. सदर गुन्हयाचा तपास, भाईंदर पोलीस ठाणे हे करीत आहे. Mira Bhayandar Crime News

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड Prakash Gaikwad , पोलीस उपायुक्त परीमडंळ 1, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार राजेश श्रीवास्तव,रविंद्र भालेराव,किरण पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस शिपाई संजय चव्हाण यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. Mira Bhayandar Crime News

हेही वाचा: Mumbai Breaking News : घाटकोपर परिसरात भूस्खलन, 10 ते 12 झोपड्या रिकामी, बचावकार्य सुरू

शेअर करा