मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

'मसाप जीवनगौरव पुरस्कार' प्रतिभा रानडे यांना जाहीर

वितरण सोहळा २६ मे दुपारी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

'मसाप जीवनगौरव पुरस्कार' प्रतिभा रानडे यांना जाहीर

वितरण सोहळा २६ मे दुपारी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार

निलेश राऊत
पुणे:
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार' प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे आणि 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' प्रसिद्ध कार्यकर्ते डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. २६) दुपारी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून यावेळी ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडित सत्यशील देशपांडे, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते हृषिकेश जोशी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती 'मसाप'च्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यवाह अंजली कुलकर्णी, सुनील महाजन आणि डॉ. आशुतोष जावडेकर उपस्थित होते.

राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा करंडक मसाप शाखा गुहागरला, रत्नाकर कुलकर्णी स्मृती मसाप उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आटपाडी येथील दिनेश देशमुख आणि सोलापूर येथील अश्विनी चव्हाण यांना देण्यात येणार आहे. राजन लाखे पुरस्कृत डॉ. बाबुराव लाखे स्मृती वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा दक्षिण सोलापूरला, डॉ. राजा दीक्षित पुरस्कृत म. श्री. दीक्षित स्मृती मसाप स्नेहबंध पुरस्कार अशोक सुलाखे यांना दिला जाणार आहे.

पुरस्कार वितरणानंतर कवी वैभव जोशी यांचा 'द मनमौजी' हा कार्यक्रम होणार आहे. मसापच्या वर्धापनदिन कार्यक्रमात यंदा बदल केला असून २६ मे रोजी पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि २७ मे या वर्धापनदिनी स्नेहमेळावा होणार आहे, असे संयोजकांनी सांगितले.

विशेष ग्रंथकार पुरस्कार या मान्यवरांना जाहीर
राजेंद्र खेर, अशोक कोतवाल, प्रवीण दवणे, संतोष पवार, आनंद हर्डीकर, श्रीनिवास भणगे, शेखर ढवळीकर, श्रीराम पवार, डॉ. सुरेश सावंत, मीना वैशंपायन, दिलीप कुलकर्णी, शुचिता नांदापूरकर-फडके, मृणालिनी चितळे, सुरेश वांदिले, नीलम माणगावे आणि आनंद देशमुख.

वार्षिक ग्रंथ पारितोषिकाचे मानकरी
पृथ्वीराज तौर, स्वाती काटे, डॉ. शुभंकर कुलकर्णी, शर्मिला फडके, डॉ. अनिरुद्ध वझलवार, सुनील देशपांडे, डॉ. सतीश बडवे, राजीव नंदकर, संतोष शिंत्रे, डॉ. अरुण गद्रे, अशोक रिठे, डॉ. प्रमोद मुनघाटे, सूरज चौगुले, कल्पना दुधाळ, डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, अप्पासाहेब खोत, विक्रम भागवत, संतोष शिंदे, डॉ. कल्याणी हर्डीकर, अभिषेक धनगर (वॉल्डन पब्लिकेशन), संगीता अरबुने, उपेंद्र कुलकर्णी, डॉ. रमेश रावळकर, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. चंद्रशेखर फणसळकर, स्टीफन परेरा, राजीव जोशी, दादासाहेब आणि विद्या तळवळकर, श्याम जोशी, गोपाळ जोशी, डॉ. स्वाती महाळंक, राजेंद्र ठाकूर-देसाई, रघुनंदन गोखले, निरंजन मेढेकर, राजेंद्र भट, डॉ. अस्मिता हवालदार, मानसी शेठमांद्रेकर आणि संजीव कांबळे.

पुणे न्यूज

शेअर करा