मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Marathi Ekikaran Samiti : "मराठी माणसांच्या आंदोलनाला अडथळा, 6 ऑगस्टच्या घटनेवर कारवाई का नाही?"

Marathi Ekikaran Samiti Members Protesting At Dadar Kabutar Khana : गोवर्धन देशमुख ताब्यात; दादर कबुतरखान्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Marathi Ekikaran Samiti : "मराठी माणसांच्या आंदोलनाला अडथळा, 6 ऑगस्टच्या घटनेवर कारवाई का नाही?"

Marathi Ekikaran Samiti Members Protesting At Dadar Kabutar Khana : गोवर्धन देशमुख ताब्यात; दादर कबुतरखान्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबई :- दादर कबुतरखान्याबाहेर आज मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. 6 ऑगस्टला जैन समाजाने चाकू-सुऱ्यांसह ताडपत्री फाडून आंदोलन केले, तरीही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असा सवाल समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला. "त्या दिवशी पोलिस गप्प का होते? आणि आता मराठी माणूस शांततेने आंदोलन करत असताना त्याला का अडवले जाते?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. Marathi Ekikaran Samiti Members Protesting At Dadar Kabutar Khana

पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत, काल रात्रीच कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मात्र सकाळी 11 वाजता देशमुख व अन्य कार्यकर्ते कबुतरखान्याबाहेर पोहोचले आणि पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी देशमुख यांना घेरून ताब्यात घेतले. "पोलिसांनी सहकार्य करावे, आणीबाणीचा काळ आणू नका," अशी त्यांची मागणी होती.

या परिसरात सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुकानं बंद ठेवण्याचे आवाहन झाले होते. देशमुख यांना ताब्यात घेतल्यावर कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. पोलिसांनी 6 ऑगस्टला जैन समाजाला दिलेला ‘मोकळा मार्ग’ आणि आज मराठी आंदोलनाला लावलेली बंदी यावरून ‘दुहेरी निकष’ असल्याची टीका होत आहे.

शेअर करा