मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Malegaon blast case : मालेगाव स्फोट आरोपी निर्दोष: जलील यांचा 'न्याय'व्यवस्थेवर संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या 'सुमोटो' हस्तक्षेपाची मागणी!

Malegaon blast case Sadhvi pradnya: मालेगाव स्फोट: निर्दोष सुटकेवर वादंग!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Malegaon blast case : मालेगाव स्फोट आरोपी निर्दोष: जलील यांचा 'न्याय'व्यवस्थेवर संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या 'सुमोटो' हस्तक्षेपाची मागणी!

Malegaon blast case Sadhvi pradnya: मालेगाव स्फोट: निर्दोष सुटकेवर वादंग! जलील संतापले, सर्वोच्च न्यायालयाची दार ठोठावणार?

छत्रपती संभाजी नगर :- मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व 7 आरोपींची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष सुटका केली. या निर्णयावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महायुती सरकारला या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं आवाहन केलं आहे. जर राज्य सरकारने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेलं नाही, तर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची 'सुमोटो' दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. Malegaon blast case Sadhvi pradnya

29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.38 वाजता मालेगावच्या भिकू चौकालगत एका दुचाकीवर झालेल्या स्फोटात 6 जण ठार, तर 90 हून अधिक जण जखमी झाले होते. गुरुवारी एनआयए कोर्टाने या खटल्याचा निकाल दिला, ज्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर धर द्विवेदी या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका झाली.

या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त करताना इम्तियाज जलील म्हणाले की, "जेव्हा ही घटना घडली, तेव्हा विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण सत्तेत होते. मग हे आरोपी निर्दोष असतील, तर या नेत्यांनी बॉम्बस्फोट होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही कोणत्याही रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याला आरोपी करू, असं सांगितलं होतं का?" हा एक गंभीर विषय असून, त्यावर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.

जलील यांनी सरकारला आठवण करून दिली की, रेल्वे बॉम्बस्फोटाच्या निकालाला ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं, त्याच प्रकारे मालेगाव प्रकरणालाही आव्हान दिलं पाहिजे. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याला आव्हान देण्याची मागणी केली होती. "आता मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातही न्याय हवा असेल, तर जात, धर्म आणि राजकारण न पाहता तत्काळ या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं पाहिजे," असं आवाहन जलील यांनी केलं.

शेअर करा