मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mahavitaran Officer Bribe : महावितरणच्या अधिकाऱ्यालाच एसीबीचा ‘करंट’

ACB Trap On Mahavitaran Officers : राज्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mahavitaran Officer Bribe : महावितरणच्या अधिकाऱ्यालाच एसीबीचा ‘करंट’

ACB Trap On Mahavitaran Officers : राज्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने ठाणे जिल्ह्यात जोरदार कारवाई होत आहे. नुकतीच एक मोठी कारवाई ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एसीबीच्या पथकाने केल्यानं खळबळ उडाली आहे.

डोंबिवली :- गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Corruption Bureau कारवायाबाबत चर्चा आहे. एसीबीने बुधवारी डोंबिवलीत मोठी कारवाई करण्यात आली आहे.महावितरण कंपनीचा डोंबिवलीच्या शिळफाटा ग्रामीण सेक्शन विभागात असलेला Dombivli Mahavitaran Officer Bribe लाचखोर सहाय्यक इंजिनिअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.या कारवाईमुळे महावितरणातील अन्य लाचखोरांचे देखील धाबे दणाणले आहेत.सुरेश भीमराव लबडे (43 वर्ष) सहाय्यक अभियंता असे लाचखोर महावितरणच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी केली आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे. Anti Corruption Bureau Latest News

तक्रारदार यांना नवीन वीज मीटर लावण्यासाठी सहाय्यक अभियंता यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर लाचखोर अभियंता याने तक्रारदार यांना नवीन विजा मीटर जोडण्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडअंती एका मीटर साठी 650 रुपये निश्चित करण्यात आले. तसेच चार वीज मीटर चे 650 प्रमाणे 2,600 रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. तक्रारदार याने ठाणे एसीबी कार्यालयात लाचखोर सहाय्यक अभियंता सुरेश लबडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी करून सापळा रचून 2600 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. लबडे यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anti Corruption Bureau Latest News

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुनिल लोखंडे पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे,महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो रूपाली पोळ यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईनंतर महावितरण मधील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. Anti Corruption Bureau Latest News

हेही वाचा: Ambernath Kidnapping News : अपहरणाचे षडयंत्र पोलिसांनी लावलं उधळुन ; अंबरनाथमधील "त्या"अपहरणाचा गुंता सुटला

हेही वाचा: Devendra Fadnavis : बदला पूरा… मुंबईत रिव्हॉल्व्हर धरून देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर

शेअर करा