मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Vidhan Sabha Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात "गद्दार गद्दार" घोषणा देणारा काँग्रेसचा पदाधिकारी ठाकरे गटात

Chandivali Vidhan Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाब विचारण्यासाठी थेट काँग्रेस कार्यालयात

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM Eknath Shinde Latest News

Chandivali Vidhan Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाब विचारण्यासाठी थेट काँग्रेस कार्यालयात

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचा ताफा मुंबईतून जात असताना काँग्रेस कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दार गद्दार अशी घोषणा दिली होती. संतप्त मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस प्रचार कार्यालयामध्ये प्रवेश करून जाब विचारण्यासाठी गेले होते.

चांदिवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नसीम खान हे उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यालयासमोरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. तसेच गद्दार असे म्हणत घोषणा देण्यात आल्या. याच वेळी संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. हे ऐकताच मुख्यमंत्र्यांचा पारा चढला असल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी चिडले आणि थेट गाडीतून उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात चालत गेले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना "ऐसा सिखाते क्या आप लोग?", अशा कडक शब्दात शिंदेंनी खडसावले. यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश!
संतोष कटके याचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटकेने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याने ते चर्चेत आले आहेत. संतोष कटके यांनी सकाळीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट देखील त्याने घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारले की काल शाखेत कोण होते? तेव्हा कार्यकर्त्यांनी संतोष कटके याला पुढे केले आणि सांगितले की हाच होता ज्याने गद्दार म्हणले. यावर उद्धव ठाकरे यांनी शाब्बास !! हा फोटो मुद्दाम द्या, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया दिली.

शेअर करा