मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : हिंदी सक्तीविरोधात आंदोलन, ठाकरे गटाला 'विजयी मेळाव्या'पूर्वी मोठा दणका!

•जमाबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : हिंदी सक्तीविरोधात आंदोलन, ठाकरे गटाला 'विजयी मेळाव्या'पूर्वी मोठा दणका!

•जमाबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई :– राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या विरोधात निर्माण झालेल्या संतप्त वातावरणात मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र होते. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर मागे घेतल्याने 5 जुलै रोजी नियोजित भव्य मोर्चा रद्द करण्यात आला असला तरी, त्याऐवजी 'विजयी मेळाव्याचे' आयोजन करून ठाकरेंनी पुन्हा मैदान गाजवण्याची तयारी केली आहे.

मात्र याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या रविवारी मुंबईतील आझाद मैदानात हिंदी सक्तीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवत, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान त्रिभाषा जीआरच्या प्रतीची होळी करण्यात आली होती. परंतु यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि पोलीस आयुक्तांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने हे प्रकरण आता कायदेशीर वळणावर गेलं आहे.

आझाद मैदान पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 190, 223 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, यात शालेय अभ्यास आणि कृती समितीचे दीपक पवार, ठाकरे गटाचे विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख संतोष घरत, संघटिका युगेंद्रा साळेकर यांचा समावेश आहे.

या घडामोडीमुळे एकीकडे ५ जुलैच्या 'विजयी मेळाव्या'साठी जोमात तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय तापमान वाढले आहे. आता या परिस्थितीत 'विजयी मेळावा'तून ठाकरे बंधू कोणता राजकीय संदेश देतात आणि हिंदी सक्तीविरोधातील संघर्षाची दिशा काय राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Vijayi Melava : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! ‘विजयी मेळाव्या’ तून मराठी अस्मितेचा बिगुल

शेअर करा