मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : 48 मतांनी विजय प्रकरणी हायकोर्टाचा निकाल, शिवसेना खासदारांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

•लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना निकराच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : 48 मतांनी विजय प्रकरणी हायकोर्टाचा निकाल, शिवसेना खासदारांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

•लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना निकराच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी पराभव केला.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (19 डिसेंबर) फेटाळली. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या विजयाला त्यांनी आव्हान दिले होते.

कीर्तिकर यांनी त्यांच्या याचिकेत वायकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून खासदार म्हणून केलेली निवडणूक रद्द करण्याची मागणी हायकोर्टात केली होती. मात्र, न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे) नेते कीर्तिकर यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला आहे की, मतमोजणीच्या दिवशीच त्यांनी मतांच्या फेरमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता.कीर्तिकर यांचा लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वायकर यांच्याकडून 48 मतांनी पराभव झाला होता.

वायकर यांना 4,52,644 कीर्तीकर यांना 4,52,596 मते मिळाली. शिवसेना (UBT) नेत्याने त्यांच्या याचिकेत दावा केला आहे की मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर त्रुटी होत्या, ज्यामुळे निवडणूक निकालांवर परिणाम झाला.

हेही वाचा: Amit Shah Ambedkar Remarks : आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल, अमित शहा यांच्याविरोधात आज देशभरात निदर्शने

शेअर करा