मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

पनवेल : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,लोकशाही भारत न्युजचे संपादक डॉ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

पनवेल : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,लोकशाही भारत न्युजचे संपादक डॉ. मुनीर तांबोळी यांची शरदचंद्र पवार साहेब,सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पिंपरी चिंचवड निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यावेळी पक्षाचे प्रवक्ते नसीम सिद्धिकी, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुलतान मालदार, संजोग वाघेरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. मुनीर तांबोळी यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने या संधीचे नक्कीच सोने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया या वेळी डॉ.मुनीर तांबोळी यांनी दिली.त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

हेही वाचा: PM Modi On Budget Session : 'जितक्या लढाया लढाव्या लागल्या…', अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधी खासदारांना थेट संदेश

शेअर करा